Ola Discount eSakal
विज्ञान-तंत्र

Ola Price Cut : ई-स्कूटर घेण्याची हीच संधी! ओलाने कमी केली आपल्या गाड्यांची किंमत; मिळणार तब्बल 25,000 रुपये सूट

Ola S1 New Price : मीडिया रिपोर्टनुसार ओला आपल्या ग्राहकांना इतर फायनान्स ऑप्शन्स देखील देत आहे. यामध्ये झीरो डाऊन पेमेंट, नो-कॉस्ट ईएमआय, झीरो प्रोसेसिंग फी अशा ऑफर्सचा समावेश आहे.

Sudesh

Ola Electric Scooter New Price : ई-स्कूटर बनवणाऱ्या भारतातील कंपन्यांपैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे ओला. तुम्हीदेखील ई-स्कूटर घेण्याच्या विचारात असाल, तर कंपनीने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. ओलाने आपल्या S1 स्कूटरच्या रेंजमध्ये तब्बल 25,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. या किंमती तातडीने लागू होणार असल्याचंही ओलाने स्पष्ट केलं.

कुठल्या मॉडेलची किती किंमत?

ओलाने आपल्या गाड्यांच्या सुधारित किंमती देखील जाहीर केल्या आहेत. Ola S1X+ या मॉडेलची किंमत 1.09 लाखांवरुन 84,999 रुपये झाली आहे. Ola S1 Air मॉडेलची किंमत 1.19 लाखांवरुन 1.05 लाख रुपये झाली आहे. Ola S1 Pro या मॉडेलची किंमत 1.48 लाखांवरुन 1.30 लाख रुपये करण्यात आली आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. (Ola Scooter New price)

इतर ऑफर्सही मिळणार

मीडिया रिपोर्टनुसार ओला आपल्या ग्राहकांना इतर फायनान्स ऑप्शन्स देखील देत आहे. यामध्ये झीरो डाऊन पेमेंट, नो-कॉस्ट ईएमआय, झीरो प्रोसेसिंग फी तसंच 7.99 टक्के एवढा व्याजदर अशा ऑफर्सचा समावेश आहे. ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करणे, तसंच आवश्यक ती आर्थिक मदत उपलब्ध करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. (Ola Scooter Offers)

ओला आपल्या S1 Air आणि S1 Pro या स्कूटरच्या बॅटरीवर तब्बल 8 वर्षे/80,000 किलोमीटर वॉरंटी देत आहे. सोबतच, ग्राहक 5,000 रुपयांमध्ये एक लाख किलोमीटर, आणि 12,500 रुपये देऊन 1.25 लाख किलोमीटरची एक्स्टेंडेड वॉरंटी देखील मिळवू शकतात. (Ola Extended Warranty)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT