E-Luna : पुन्हा एकदा सगळे म्हणणार 'चल मेरी लुना..'; इलेक्ट्रिक रुपात परत आली लोकप्रिय मोपेड! किती आहे किंमत?

Kinetic Green : ई-लुना बॅटरीच्या क्षमेतवर आधारित तीन प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये १.७ किलो वॉट, दोन किलो वॉट आणि तीन किलो वॉट क्षमतेची बॅटरी आहे.
Kinetic Green E-Luna
Kinetic Green E-LunaeSakal

Kinetic E-Luna : एकेकाळी ‘चल मेरी लुना’ म्हणत घराघरांत पोहोचलेली कायनेटिकची लुना आता इलेक्ट्रिक स्वरूपात पुन्हा दाखल झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कायनेटिक ग्रीन कंपनीने ही ‘ई-लुना’ बाजारात आणली आहे. या ‘ई-लुना’चे अनावरण केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.

यावेळी अवजड उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. हनीफ कुरेशी, कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया, ‘कायनेटिक ग्रीन’च्या संस्थापक आणि सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी, कायनेटिक ग्रीनचे कार्यकारी संचालक रितेश मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते. प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी सुसज्ज अशा स्टायलिश, बहु-उपयोगी अशा ‘ई-लुना’ची किंमत (एक्स-शोरूम) ६९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे. (E-Luna Price)

ही देशातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी आहे. ई-मोबिलिटी सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी बनवण्याच्या उद्देशाने तिची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये दोन किलो वॉट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी असून, ती एका चार्जमध्ये ११० किमी धावते. कायनेटिक ग्रीनच्या अधिकृत वेबसाईटवर अवघ्या 500 रुपयांमध्ये तुम्ही ई-लुना बुक करू शकता. (E-Luna Booking)

Kinetic Green E-Luna
Budget 2024 Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; उत्पादन अन् चार्जिंग स्टेशन वाढवणार!

ई-लुना बॅटरीच्या क्षमेतवर आधारित तीन प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये १.७ किलो वॉट, दोन किलो वॉट आणि तीन किलो वॉट क्षमतेची बॅटरी आहे. जलद बॅटरी चार्जिंग तंत्रज्ञान आणि बदलण्यायोग्य बॅटरी पर्यायही उपलब्ध आहे. कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टीम, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, तीन राइडिंग मोड, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी साइड स्टँड सेन्सर आदी अनेक वैशिष्ट्यांनी ती सुसज्ज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com