Modi Sakal
विज्ञान-तंत्र

PM Modi: ट्विटरने हटवली पंतप्रधान मोदींची ब्लू टिक, केला 'हा' मोठा बदल

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने आपल्या व्हेरिफाय पॉलिसीत बदल केले आहेत. या अंतर्गत कंपन्यांना गोल्ड, सरकारी संस्था आणि व्यक्तींना ग्रे आणि सर्वसामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

PM Modi Twitter Account: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने काही दिवसांपूर्वीच आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. या सर्व्हिस अंतर्गत यूजर्सला ठराविक रक्कम मोजून व्हेरिफाइड टिक मिळणार आहे. यासोबतच, आता वेगवेगळ्या अकाउंटसाठी ब्लू, गोल्डन, ग्रे रंगाची व्हेरिफाइड टिक पाहायला मिळणार आहे. हे बदल सुरू झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची ब्लू टिक काढण्यात आली आहे. त्यांच्या अकाउंटसमोर आता ग्रे टिक दिसत आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

PM Modi

ग्रे टिकचे नियम पूर्णपणे लागू करण्यात आलेले नाहीत. अनेक राजकीय नेत्यांच्या हँडेलसमोर अद्याप ब्लू टिकच दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अकाउंटवर अद्याप ब्लू टिक दिसत आहे. ट्विटरने व्हेरिफाय पॉलिसीत बदल केला असून, या अंतर्गत कंपन्यांना गोल्ड, सरकारी संस्था आणि व्यक्तींना ग्रे आणि सर्वसामान्य व्यक्तींना ब्लू टिक मिळेल.

बाइडेन, ऋषि सुनक यांच्या व्हेरिफाय टिकमध्येही बदल

पंतप्रधान मोदींसोबतच इतर सरकारी संस्थांच्या अकाउंट्सच्या ट्विटर हँडवर ग्रे टिक पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाइडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर ग्रे टिक दिसत आहे.

दरम्यान, अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यापासून सातत्याने प्लॅटफॉर्म्सवर बदल पाहायला मिळत आहेत. कंपनीने ट्विटर ब्लू ही पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस लाँच केली आहे. या सर्व्हिससाठी यूजर्सला ८ डॉलर्स खर्च करावे लागतील. ही पेड सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर यूजर्सला एडिट बटन, हाय-क्वालिटी व्हीडिओ अपलोड करणे इत्यादी फीचर्स देखील वापरता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT