Elon Musk: जनमताचा कौल! मस्क ट्विटर सोडणार? पाहा काय आला पोलचा रिझल्ट

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क गेल्याकाही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आता त्यांनी ट्विटरचे प्रमुखपद सोडावे की नाही, यासाठी स्वतःच पोल घेतला आहे.
Elon Musk
Elon MuskSakal

Elon Musk Twitter poll results: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क गेल्याकाही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरला खरेदी केल्यापासून मस्क आपल्या निर्णयाने अनेक धक्का देत आहेत. ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यापासून ते प्लॅटफॉर्म्सवर नवीन फीचर आणण्यापर्यंत, मस्क यांनी आपल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. आता त्यांनी ट्विटरचे सीईओपद सोडावे की नाही, यासाठी पोल घेतला आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

इलॉन मस्क यांनी पोल करत मी ट्विटरचे प्रमुखपद सोडावे का? असा प्रश्न विचारला आहे. सोबतच जो निर्णय असेल त्याचे पालन करेल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या पोलमध्ये बहुतांशजणांनी मस्क यांनी सीईओपद सोडावे या बाजूने मत दिले आहे.

मस्क यांच्या या पोलवर जवळपास १,७५,०२,३९१ लोकांनी मत दिले आहे. यातील ५७.५ टक्के यूजर्सने ट्विटरचे प्रमुखपद सौडावे या बाजूने मत दिले आहे. तर ४२.५ टक्के यूजर्सने पद सोडू नये या बाजूने मत दिले आहे. विशेष म्हणजे पोलचा निर्णय मान्य करणार असल्याचे मस्क यांनी म्हटले होते. त्यामुळे आता ते काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'जे लोक हो म्हणत आहेत, कदाचित त्यांना हवे ते होऊ शकते', असेही मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

Elon Musk
YouTube: युट्यूबचा Pornhub ला दणका, केली मोठी कारवाई

दरम्यान, मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ४४ अब्ज डॉलर्स मोजून ट्विटरला खरेदी केले आहे. ट्विटरची मालकी आल्यापासून मस्क सातत्याने प्लॅटफॉर्म्सवर बदल करत आहेत. नुकतेच ट्विटरने आपली पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिस Twitter Blue ला लाँच केले आहे. या पेड सबस्क्रिप्शन अंतर्गत यूजर्सला व्हेरिफाइड टिकस खास फीचर्सचा फायदा मिळेल.

हेही वाचा: Year Ender 2022: Ertiga ते Innova... वर्षातील 'या' आहेत बेस्ट सेलिंग ७ सीटर कार, किंमत ६ लाखांपासून सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com