Telecom Regulatory Authority of India esakal
विज्ञान-तंत्र

TRAI New Rules : 1 मे पासून लागू होणार नवीन नियम; कॉल्स आणि SMS मध्ये होणार 'हे' बदल

भारतातील टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (Telecom Regulatory Authority of India TRAI) कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ डिजिटल टीम

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (TRAI) या मुद्द्यावर टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी केला आहे.

भारतातील टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (Telecom Regulatory Authority of India TRAI) कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतलाय. नवीन नियमांतर्गत TRAI एक फिल्टर सेटअप करीत आहे. हा नियम १ मे २०२३ पासून फोनमधील फेक कॉल आणि SMS ला रोखण्याचं काम करणार आहे. यानंतर यूजर्सची अज्ञात कॉल आणि मेसेज पासून सुटका होणार आहे. जाणून घ्या या नवीन नियमांसंबंधी..

1 मे पासून लागू होणार नवीन नियम

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियानं (TRAI) या मुद्द्यावर टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी केला आहे. ते आपल्या फोन कॉल आणि मेसेज सेवेत (Calls and Messages) आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर लावणे गरजेचे आहे. हे फिल्टर यूजर्सला फेक कॉल आणि मेसेज पासून सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. या नवीन नियमानुसार, फोन कॉल आणि मेसेज संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना १ मे २०२३ पासून फिल्टर लावावे लागणार आहे.

या संबंधी एअरटेलने आधीच एक प्रकारच्या AI फिल्टरची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. तर जिओने या नवीन नियमांनुसार, आपल्या सेवेत AI फिल्टर लावण्याची तयारी करण्याची घोषणा केली आहे. सध्या यासंबंधी जास्त माहिती समोर आली नाही. परंतु, असा अंदाज लावला जात आहे की, भारतात AI फिल्टरचे अर्ज १ मे २०२३ पासून सुरू होणार आहेत.

ट्रायकडून फेक कॉल आणि मेसेजला रोखण्यासाठी नियम बनवण्यासाठी एक योजना बनवली आहे. याअंतर्गत ट्रायने १० अंकाच्या मोबाइल नंबरवरून करण्यात येणाऱ्या प्रमोशनल कॉलला रोखण्याची मागणी केली आहे. याशिवाय, ट्राय कॉलर आयडी फीचर सुद्धा आणले आहे. जे कॉल केल्यानंतर फोटो आणि नाव डिस्प्ले होणार आहे. टेलिकॉम कंपन्या एअरटेल आणि जिओची TrueCaller अॅप सोबत चर्चा सुरू आहे. परंतु, ते कॉलर आयडी फीचर लागू करण्यापासून आढेवेढे घेत आहे. कारण, त्यांच्या म्हणण्यानुसार, असे केले तर काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT