VIDEO : टोकाचे विरोधक बेळगाव विमानतळावर आले आमनेसामने; बोम्मई-सिद्धरामय्यांच्या भेटीत काय घडलं?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख अगदी जवळ आलीये.
CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airport
CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airportesakal
Updated on
Summary

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख अगदी जवळ आलीये. या निवडणुकीत मुख्य लढत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. आज (बुधवार) विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कर्नाटकमध्ये अत्यंत भारलेल्या वातावरणात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) बेळगावच्या सांब्रा विमानतळावर (Sambra Airport) अचानक आमनेसामने आले.

CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airport
Karnataka Election : कर्नाटकात Exit Poll काँग्रेसच्या बाजूनं; PM मोदी 6 दिवसांत घेणार तब्बल 15 सभा अन् रोड शो

आज बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे जिल्ह्यातील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगाव विमानतळावर पोहोचले असता, त्यांनी तिथं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची अचानक भेट घेतली.

CM Basavaraj Bommai-Siddaramaiah Meet at Belagav Sambra Airport
Karnataka Election : कर्नाटकात एन्ट्री होताच CM योगींनी उचलला आरक्षणाचा मुद्दा; म्हणाले, संविधानाच्या विरोधात..

नुकतेच सिद्धरामय्या यांनी बोम्मई हे 'भ्रष्ट मुख्यमंत्री' असल्याचा आरोप केला होता. मात्र, आज जेव्हा दोन्ही नेते एकमेकांना पाहून पुढं सरसावले आणि त्यांनी विमानतळावर एकमेकांचं स्वागत करत हस्तांदोलन केलं. गेल्या आठवड्यात बोम्मई बेंगळुरूमध्ये एका खासगी कार्यक्रमात खर्गे यांना हात जोडून अभिवादन करताना दिसले होते. मात्र, या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

dk shivakumar
DK Shivakumar cabinet expansion today
Siddaramaiah Announces Retirement from Electoral Politics
Karnataka Congress criticism of RSS meeting
Marathi News Esakal
www.esakal.com