Smartphone Recording eSakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Recording : तुमचा स्मार्टफोन गुपचूप रेकॉर्ड करतोय तुमचं बोलणं; लगेच बंद करा ही सेटिंग!

Smartphone Tips : स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गप्पा रेकॉर्ड करण्याचं कामही काही अ‍ॅप्स अगदी सहजपणे करू शकतात.

Sudesh

Technology News : सध्या आपलं खासगी आयुष्य लपवून ठेवणं हे खूप अवघड झालं आहे. कित्येक अ‍ॅप्स आणि हॅकर्स विविध पद्धतीने तुमचा डेटा आणि गोपनीय माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमची माहिती चोरू शकतो.

यासाठी तुमच्या फोनमधील कित्येक अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. अर्थात, तुम्हाला हे थांबवता देखील येतं. मात्र, कित्येक लोकांना याबाबत माहिती देखील नसते. त्यामुळेच, तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमच्या गप्पा रेकॉर्ड करण्याचं कामही काही अ‍ॅप्स अगदी सहजपणे करू शकतात.

आपणच देतो परवानगी

जेव्हा आपण एखादं अ‍ॅप इन्स्टॉल करतो, तेव्हा ते आपल्याला बऱ्याच परमिशन मागतं. यातील एक परमिशन म्हणजे, मायक्रोफोन अ‍ॅक्सेस. एखाद्या अ‍ॅपला जेव्हा तुम्ही मायक्रोफोन वापरण्याची परवानगी देता, तेव्हा त्या अ‍ॅपला तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं बोलणं रेकॉर्ड करण्याची देखील परवानगी देत असता.

कित्येक अ‍ॅप्स अशा प्रकारचा डेटा खरंतर स्टोअर किंवा शेअर करत नाहीत. मात्र, काही अ‍ॅप्स याचा गैरवापर देखील करू शकतात. त्यामुळेच, कित्येक वेळा आपण एखाद्या वस्तूबद्दल किंवा प्रॉडक्टबद्दल गप्पा मारतो, तेव्हा तशाच प्रकारच्या जाहिराती आपल्याला दिसू लागतात.

अशी बंद करा सेटिंग

अशा प्रकारची हेरगिरी टाळण्यासाठी एखादं अ‍ॅप वापरत नसताना त्याचा मायक्रोफोन अ‍ॅक्सेस काढून घेणंच योग्य ठरतं. यासाठी तुम्हाला सर्वात आधी सेटिंग्समध्ये जावं लागेल. त्यानंतर अ‍ॅप मॅनेजमेंटमध्ये जाऊन तुम्हाला ज्या अ‍ॅपवर संशय आहे ते सिलेक्ट करा. यानंतर अ‍ॅप परमिशन हा पर्याय निवडा.

यामध्ये तुम्हाला दिसेल, की त्या अ‍ॅपला कोणकोणत्या प्रकारच्या परमिशन तुम्ही दिल्या आहेत. यामध्ये साधारणपणे फाईल अ‍ॅक्सेस, कॅमेरा अ‍ॅक्सेस, मायक्रोफोन अ‍ॅक्सेस, कॉलिंग अ‍ॅक्सेस, कॉन्टॅक्ट्स अ‍ॅक्सेस अशा परवानग्यांचा समावेश असतो. यातील मायक्रोफोन अ‍ॅक्सेस ही परवानगी काढून घेतल्यास ते अ‍ॅप तुमचं बोलणं रेकॉर्ड करू शकत नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT