IRCTC special air travel package  सकाळ डिजिटल टीम
टूरिझम

IRCTC: श्रावण महिन्यात विमानाने घडवणार ज्योतिर्लिंग आणि शिर्डीचे दर्शन

IRCTC ने प्रवाशांसाठी महाराष्ट्र टूर पॅकेज तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ डिजिटल टीम

IRCTC Air Travel Package for Shravan: इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग, शिर्डी, शनी मंदिर याशिवाय वेरुळच्या लेण्या आणि जवळपासच्या पर्यटन स्थळांचं दर्शन घडवणार आहे. हा प्रवास विमानाने असेल. 7 ऑगस्ट रोजी रायपूर येथून यात्रेकरूंचे उड्डाण होईल. या पॅकेजचा लाभ फक्त 10 लोकांनाच मिळणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 30 हजार 250 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये हवाई प्रवास तसेच थ्री स्टार हॉटेलमध्ये निवास, तसेच एसी वाहनात जेवण आणि सहलीचा समावेश असेल.

IRCTC ने प्रवाशांसाठी महाराष्ट्र टूर पॅकेज तयार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास IRCTC च्या या पॅकेजचा फायदा आणखी एक किंवा दोनदा मिळू शकतो. कोरोना संक्रमण काळात, IRCTC ची प्रवास योजना रद्द करण्यात आली होती. यामध्ये ट्रेन तसेच राजस्थानच्या फ्लाइट पॅकेजचा समावेश होता. आता परिस्थिती सामान्य झाल्यावर लोक तीर्थयात्रांबरोबरच प्रेक्षणीय स्थळीही जात आहेत. हे पाहता आयआरसीटीसीने बिलासपूरच्या प्रादेशिक कार्यालयातून श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगासह शिर्डी आणि शनी मंदिराचं दर्शन घडवण्याचे पॅकेज तयार केले आहे.

प्रतिव्यक्ती 30 हजार 250 रुपये निश्‍चित आहे. मात्र दोन सदस्यांना जायचे असेल तर भाडे 24 हजार 195 रुपये केले जाणार आहे. तीन जणांना जाण्यासाठी यात सूट देण्यात आली आहे. यामध्ये केवळ २३ हजार २८५ रुपये भरून टूर करता येणार आहे. IRCTC एरिया मॅनेजर जेराल्ड सोरेन यांनी सांगितले की, प्रवासादरम्यान दोन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले जाईल. यामध्ये एक त्र्यंबकेश्वर आणि दुसरे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे. चार दिवसांच्या या प्रवासानंतर प्रवासी 10 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता रायपूर विमानतळावर पोहोचतील.

साउथ सेंट्रल झोनहून दुसऱ्या शहराचे पॅकेज हैदराबाद

पुरी जगन्नाथ यात्रा- 30 जून- शिर्डी व शनि मंदिर – 9 व 13 जुलै आणि 13 व 27 ऑगस्ट
विशाखापट्टणम- तिरुपति बालाजी दर्शन- 10 व 24 जून, 15 व 29 जुलै, 12 व 26 अगस्त, 9 सप्टेंबर

भुवनेश्वर- चार धाम - 10 जून- अरुणाचल प्रदेश - 9 जून- शिर्डी - सात जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT