Sakal travelogue in Firaste by Harshada Kotwal 
टूरिझम

चलो, बॅग उठाओ और निकल पडो

हर्षदा कोतवाल

ज्या उत्सुकतेने तुम्ही हे सदर वाचायला घेतले आहे म्हणजे नक्कीच तुम्ही आणि मी खूप सेम आहोत. मलाही तुमच्यासारखंच भटकायला आवडतं. तुमच्यासारखंच छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत, गडकोट माझे जिवलग आणि ट्रेकिंग माझं पहिलं प्रेम. म्हणूनच या सदरातून मी फक्त प्रेम देणार आहे. म्हणजेच मी केलेल्या ट्रेकबद्दल, गडकोटांबद्दल तुमच्याशी गप्पा मारणार आहे.

''बॅग उठाओ और निकल पडो'' हे वाक्‍य आपल्यासाठी आता किती कॉमन झालं आहे ना? खरं सांगा आपल्यापैकी किती जणांचा सुटीच्या दिवशी घरी पाय टिकतो? दर रविवारी आपला वेगवेगळ्या ठिकाणी दौरा असतो. दररोजच्या या 9 ते 5च्या चक्रातून आपण या वेडासाठी हमखास वेळ काढतो. वेडच आहे ते. भल्याभल्यांचे फक्त व्हिडिओ आणि फोटो बघून जिथे डोळे पांढरे पडतात तिथे आपण लिलया चढाया करतो आणि अनुभवाचं भलं मोठं गाठोडं घेऊन सुखरुपपणे परतही येतो. मग सुरु होतो अभिमानाने किस्से सांगण्याचा सिलसिला. या सदरात मीसुद्धा हेच करणार आहे. आजवर जेवढी काही भटकंती केली मग ती सह्याद्रीत असो, हिमालयात असो किंवा आणखी कोठे मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार आणि नुसतं सांगणार नाही तर तुमचं पुढील ड्रीम डेस्टिनेशन ठरवायलाही मदत करणार.

सध्या सगळ्यांमध्ये सोलो ट्रॅव्हलिंगचं वेड आहे. अनेकांना इच्छा असूनही भीतीपोटी किंवा काही अडचणींमुळे ते करता येत नाही. या सदरात सोलो ट्रॅव्हलिंग करणारे अनेक अवलिया आपले भन्नाट अनुभव मांडणार आहेत. तसेच सोलो ट्रॅव्हलिंग कसं करावं, त्यासाठी जागा निवडताना कोणती काळजी घ्यावी, अगदी त्या त्या ठिकाणांचे फेमस खायचे स्पॉट्‌स आणि राहण्याचा जागा या सर्वांबद्‌दल आपल्याला टिप्सही देणार आहेत.

आता विचार करा, हिमालयात पहिल्यांदा ट्रेकिंग करताना कोणता ट्रेक निवडावा अगदी तो कोणासोबत करावा, तो करताना कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी कशी तयारी करावी, मेघालयात जाताय तर अस्सल महाराष्ट्रीय जेवण कोठे मिळतं, महाराष्ट्रातले अगदी अनएक्‍सप्लोअर्ड ट्रेक्‍स कोणते असे सगळे सिक्रेटस मी आणि आपले काही मित्र-मैत्रणिी तुम्हाला दर आठवड्याला सांगणार आहेत.

आता फिरायचं कसं, कुठं ते सगळं ठिक आहे. पण, हे सगळं फिरायचं आणि तेही अत्यंत कमी पैशात. हे कसं शक्‍य करायचं याबाबतसुद्धा म्हणजेच "बजेट बॅगपॅकिंग'बद्दलही टिप्स देणार आहोत. आपल्या आवडीच्या आणि भन्नाट जागा आणि त्याही अत्यंत कमी खर्चात. कारण जसं पंकज त्रिपाठी म्हणतात ना, ट्रॅव्हलिंग हे प्रत्येकासाठी असतं. फक्त त्याच्या अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. मात्र, आपल्या सर्वांचं कारण एकच राहतं, नव्या नव्या गोषटींचा अनुभव घेणं. मग कसा वाटतोय हा प्लॅन? आता पुढच्या आठवड्यात भेटूयात थेट एका गडावर. असा गड जो महाराष्ट्रात त्याच्या नेढयासीीा खूप प्रसिद्ध आहे. कोणता बरं? करा विचार.

मग कसा वाटतोय प्लॅन?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Cricket : भारत-पाकिस्तान यांच्यात नोव्हेंबर महिन्यात दोन मॅच; जाणून घ्या कुठे, कधी भिडणार, Live Streaming कुठे?

Chandrapur ‘मन की बात’ ऐकण्याची सक्ती, विद्यार्थिनींना दंडाचा इशारा; दिवंगत काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमधील प्रकार

Torrent Project: 'टोरंट'साठी बेसुमार वृक्षतोड! तब्बल ३२ हजार झाडे तोडणार; पर्यावरणप्रेमींमध्ये संताप

IND A vs NZ A Live: लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल पुन्हा फेल! न्यूझीलंडच्या २०४ धावांच्या आघाडीचा पाठलाग करताना ढेपाळले... Video

Sindhudurg Heavy Rain: सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार पाऊस, ईशान्य मॉन्सूनचा जोर कायम

SCROLL FOR NEXT