श्रावण विशेष : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव स्वयंभू महादेव मंदिर Canva
टूरिझम

श्रावण विशेष : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव स्वयंभू महादेव मंदिर

श्रावण विशेष : सोलापूर जिल्ह्यातील एकमेव स्वयंभू महादेव मंदिर

राजकुमार शहा

जमिनीतून आपोआप पिंड उगम पावलेली आहे. त्यामुळे त्याला स्वयंभू महादेव मंदिर म्हणून संबोधले जाते. जिल्ह्यात हे एकमेव मंदिर आहे.

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Solapur-Pune National Highway) देवडी ते पापरी या रस्त्यावर पापरी हद्दीत स्वयंभू महादेव मंदिर (Mahadev Temple) असून, या मंदिरातील महादेवाची पिंड स्थापना केलेली नाही. मात्र, जमिनीतून आपोआप पिंड उगम पावलेली आहे. त्यामुळे त्याला स्वयंभू महादेव मंदिर म्हणून संबोधले जाते. जिल्ह्यात हे एकमेव मंदिर आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. हे मंदिर रम्य अशा माळरानावर वसले आहे.

पापरीपासून दोन किलोमीटर अंतरावर खंडाळी गाव आहे. त्या ठिकाणी मिरज जवळील बुधगावच्या खट्‌वांग राज्याचे साम्राज्य होते. आता ज्या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे, त्या ठिकाणी घनदाट जंगल होते. बुधगावच्या राजाला शिकारीचा छंद होता. त्याला अपत्य नव्हते. तो जंगलात शिकारीसाठी जात असे. उन्हाळ्यात एके दिवशी दुपारपर्यंत कुठलीच शिकार न मिळाल्याने राजा थकून एका झाडाखाली सावलीला थांबला. त्याच ठिकाणी त्याला झोप लागली. नंतर दृष्टांत झाला व त्याला ज्या ठिकाणी राजा झोपला त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे, त्यावर सावली कर, असे सांगण्यात आले. त्याने सावली केली. पुढे त्याला चांगले दिवस आले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

मंदिर परिसरातच शेगावचे गजानन महाराज, संत गोरोबाकाका यांच्या समाध्या आहेत. जसजशी माहिती होत गेली तसतशी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. श्रावणात या मंदिरावर सप्ताह असतो. या वेळी भजन, कीर्तन यासह वारकरी संप्रदायातील मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली जातात. गावकऱ्यांनी येणाऱ्या भाविकांची अडचण ओळखून भक्त निवासाचे बांधकाम हाती घेतले आहे. त्या ठिकाणी काही खोल्या बांधल्या आहेत. भाविकांची बसण्याची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरासमोरच भव्य असे पत्रा शेड लोकवर्गणीतून बांधले आहे.

शिवरात्रीला या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक आवर्जून दर्शनासाठी येतात. जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती आहे. महादेवासमोरच एका मोठ्या दगडापासून घडवलेला नंदी आहे. तो पापरी येथील रहिवासी स्व. महादेव कुंभार यांनी घडविला आहे. श्रावणात अनेक जण अभिषेक घालतात.

जवळचे पर्यटनस्थळ

मंदिरापासून सहा किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक असा आष्टी तलाव असून येथे उन्हाळ्यात व इतर हंगामात विविध पक्षी येतात.

खवय्यांसाठी...

महादेव मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर देवडी, वडाचीवाडी ही गावे आहेत. या ठिकाणी उत्तम प्रतीचा दुधापासून तयार केलेला खवा मिळतो. सोलापूरच्या बाजारपेठेत या खव्याला मोठी मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT