Someshwar Temple Baner  esakal
टूरिझम

Someshwar Temple Baner : अनेक ऐतिहासिक घटनांनी समृद्ध आणि शांत असं पुण्याच सोमेश्वर मंदिर!

बाणेर मध्ये असलेलं सोमेश्वर मंदिर

सकाळ डिजिटल टीम

Someshwar Temple Baner : पुण्यात अशी अनेक मंदिरं आहेत जी खूप जुनी आहेत पण त्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, ही अशी जुनी मंदिरच आपली संस्कृती जपण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. आजकालचा तरुणवर्ग अशाच जुन्या वास्तूंकडे आकर्षित होतांना दिसतो आहे.

ही जुनी मंदिरं त्यांच दगडी बांधकाम, त्यात कोरलेली बारीक आणि सुबक नक्षी यामुळे खूप सुंदर दिसतात, शिवाय मंदिर बनवतांना अनेक वास्तुशास्त्राच्या गोष्टी सुद्धा बघायला मिळतात. बाणेर मध्ये असलेलं सोमेश्वर मंदिर असंच काहीसं आहे. तब्बल 900 वर्षाहूनही हे जून असल्याच मानलं जातं.

आत्ता जरी पुणे महानगरपालिकेने इथल्या नदीला नाला म्हणून घोषित केलेल असलं तरी त्या काळी मुळा नदीची उपनदी राम नदीच्या काठी हे मंदिर वसलेल आहे. मंदिराच्या परिसरात गणपती, हनुमान आणि भैरवनाथ यांची लहान मंदिरं आहेत. मंदिराच्या उत्तरेला हवनकुंड आहे. आणि मंदीराच्या प्रवेशद्वारावर 40 फूट दीपमाळ आहे. मंदिर परिसराला आजूबाजूला दगडी तटबंदी आहे. भिंतीच्या एका भागात एक छोटी गॅलरी बांधण्यात आली आहे, ज्यात मोडी लिपीतील जुनी कागदं, चित्रे आणि काही फोटो यांच छोटसं प्रदर्शन आहे.

राजमाता जिजाऊ आऊसाहेब इथे दर्शनाला येयच्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाऊ आऊसाहेब 17 व्या शतकात जेव्हा पुण्यातल्या लाल महालात राहायला होत्या तेव्हा या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच यायच्या अशी याची आख्यायिका आहे.

शिवराम भटांना सापडलेला इथे खजिना

शिवराम भट चित्रव स्वामी यांना इथे सोन्याच्या नाण्यांचा खजिना सापडला होता, जो त्यांनी तेव्हाचे पेशवे नानासाहेब पेशव्यांना दान केलेला, धार्मिक जागेच महत्व ओळखत त्यांनी त्याचा उपयोग मंदिराच्या नूतनीकरणासाठी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT