Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Attack

Heart Attack : पहाटे हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण का जास्त असते?

Heart Attack : भारतात सर्वाधिक अचानक मृत्यमागे हार्ट अटॅक कारणीभूत आहे. हार्ट अटॅक अचानक येत असल्याने प्रत्येकजण घाबरत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वाधिक हार्ट अटॅक पहाटेला का येतात? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण खरंय.

तज्ञाच्या मते आतापर्यंत आलेल्या हार्ट अटॅकमध्ये सर्वाधिक हार्ट अटॅक हे पहाटेला आलेले आहेत. आज आपण यामागील कारणे जाणून घेणार आहोत. (why heart attack comes early in the morning read story)

  • तज्ज्ञांचे मते, हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा शरीरातून काही हार्मोन्स बाहेर पडतात. सकाळी चारच्या सुमारास, शरीर सायटोकिनिन नावाचे हार्मोन सोडते ज्यामुळे अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

  • सकाळच्या पहिल्या काही तासांत रक्तदाब आणि हृदय गती वाढते. ज्यामुळे हार्ट अटॅक वाढण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Heart Patients साठी गुलाबी थंडी धोक्याची; कारण...

  • तज्ज्ञांच्या मते, रक्तातील प्लेटलेट्स चिकट असतात त्यामुळे एड्रेनालाईनच्या स्त्रावमुळे कोरोनरी आर्टरीच्या प्लेट्स तुटतो तेव्हा हार्ट अटॅक येण्याची झटका येण्याची शक्यता जास्त असते.

  • हा हार्ट अटॅकचा झटका सकाळी ४ ते १० च्या दरम्यान येण्याची जास्त शक्यता असते.

  • विशेषत: मधुमेह, ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या लोकांना तसेच धुम्रपान करणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.

  • अपुरी झोप आणि चुकीची जीवनशैली यामुळेही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.

  • सर्वाधिक हार्ट अटॅक पहाटेला का येतात? जाणून घ्या कारणे