Travel Tips esakal
टूरिझम

Travel Tips : ग्रुपसोबत ट्रीपला जाताना ‘या’ छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा

ग्रुपसोबत ट्रीपला जाताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Travel Tips : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यानंतर, काही दिवसांनी आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. त्यामुळे, ख्रिसमसचे आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचे प्लॅनिंग देखील करतात.

फिरायला जायला सर्वांनाच आवडते. मात्र, तुम्ही ग्रुपसोबत फिरायला जाणार असाल तर आणखी धमाल आणि मस्ती तुम्हाला करता येते. ग्रुपसोबत फिरायला जाण्यात खरे तर तीच मजा असते.

मात्र, ग्रुपसोबत ट्रीपला जाताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही आधी व्यवस्थित प्लॅनिंग करणे महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला ग्रुपसोबत ट्रीपला जाताना कोणत्या छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे? त्याबद्दल सांगणार आहोत.

ट्रीपचे प्लॅनिंग

जेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपसोबत ट्रीपला जाण्याचे ठरवता तेव्हा, त्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे हे फार महत्वाचे आहे. कारण, जेव्हा तुम्ही ग्रुपसोबत ट्रीप प्लॅन करता तेव्हा जेवढे लोक ग्रुपमध्ये आहेत तेवढ्या लोकांचे हॉटेल बुकिंगपासून ते वाहतूकीपर्यंतची माहिती तुम्ही आधीपासून घेणे गरजेचे आहे.

विशेष म्हणजे अशा ग्रुप टूरमध्ये तुम्हाला चांगला डिस्काऊंट देखील मिळतो, त्यामुळे, या सगळ्या गोष्टींची माहिती घेणे आणि त्या प्रमाणे ट्रीपचे प्लॅनिंग करणे हे फार महत्वाचे आहे.

जबाबदारी वाटून घ्या

जर तुम्हाला तुमची ग्रुप ट्रीप कम्फर्टेबल असावी असे वाटत असेल तर ग्रुपमधील सर्व सदस्यांकडे प्रत्येकी एक जबाबदारी वाटून द्या. यामुळे, कुणा एका मेंबरला सर्व जबाबदारींचे टेंन्शन राहणार नाही आणि वाटून प्रत्येकाकडे जबाबदारी आल्यामुळे त्याचे व्यवस्थित नियोजन देखील केले जाईल.

उदा. एखाद्या व्यक्तीने हॉटेलचे बुकिंग केले तर एखादा व्यक्ती वाहतूकीचा खर्च आणि त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी घेईल. त्यामुळे, ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीवर समान जबाबदारी असल्यामुळे टूरचे नियोजन देखील चांगले होईल.

संवाद महत्वाचा

जेव्हा तुम्ही ग्रुप टूर प्लॅन करता तेव्हा ग्रुपमधील सदस्यांचा एकमेकांसोबत संवाद असणे हे फार महत्वाचे आहे. ग्रुपमधील सदस्यांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून गोंधळ किंवा विसंवाद असता कामा नये. यासाठी तुम्ही खास ट्रीपच्या नियोजनासाठी वेगळा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढू शकता. या ग्रुपवर मग तुम्ही ट्रीपसंबंधी महत्वाच्या गोष्टी आणि अपडेट्स शेअर करू शकाल आणि याची माहिती सर्वांना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

ENG vs PAK: जो रुटचा पाकिस्तानविरुद्ध लॉर्ड्सवर खेळताना विश्वविक्रम! सचिन तेंडुलकर, पाँटिंगलाही टाकलंय मागे

SCROLL FOR NEXT