Best Hill Stations : यंदाच्या ख्रिसमसला बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी ‘या’ हिलस्टेशन्सची करा निवड

ख्रिसमसचा विकेंड साजरा करण्यासाठी लोक विविध ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.
Best Hill Stations
Best Hill Stationsesakal

Best Hill Stations : अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. मार्केटमध्ये या ख्रिसमसची, ख्रिसमस ट्रीच्या सजावटीच्या वस्तूंची, विविध केक्स आणि खाद्यपदार्थांची नुसतीच रेलचेल पहायला मिळत आहे.

ख्रिसमसचा हा विकेंड साजरा करण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोक विविध ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. या ख्रिसमसमध्ये तुम्ही देखील फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

जर तुम्हाला बर्फवृष्टीचा आनंद घेत हा ख्रिसमसचा विकेंड साजरा करायचा असेल तर तुम्ही काही पर्यटन स्थळांचा विचार नक्कीच करायला हवा. अशाच काही सुप्रसिद्ध ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणती आहेत ही ठिकाणे ? चला तर मग जाणून घेऊयात.

Best Hill Stations
Best Places to Visit : राजस्थानचे दार्जिलिंग तुम्ही पाहिले का? नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आहे एकदम बेस्ट

गुलमर्ग (काश्मिर)

भारताचे 'नंदनवन' म्हणून ओळखले जाणारे जम्मू-काश्मिर पर्यटकांना नेहमीच खुणावते. पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ही काश्मिरची ख्याती आहे. इतका विलोभनीय येथील परिसर आहे.

जम्मू-काश्मिरमधील प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण म्हणून गुलमर्गची ख्याती आहे. या ठिकाणी १२ ही महिने पर्यटकांची गर्दी असते. येथील हिल स्टेशन्स आणि विहंगमय दृश्य त्यात आणखी बर्फवृष्टीची बरसात पर्यटकांना अधिकच आकर्षित करते.

ख्रिसमसच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुलमर्ग हे ठिकाण बेस्ट आहे. या ठिकामी बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.(Gulmarg - Kashmir)

तवांग (अरूणाचल प्रदेश)

तवांग हे ठिकाण अरूणाचल प्रदेश या राज्यातील सुप्रसिद्ध ठिकाण आहे. तवांगमध्ये हिवाळ्यात डिसेंबरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. सर्वात थंड ठिकाणांपैकी एक असेलेले हे ठिकाण पर्यटकांचे खास आकर्षण आहे.

हिवाळ्यात येथील विहंगमय दृश्य आणि टेकड्यांमधील परिसर पाहण्यासारखा असतो. या ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्या घालवण्यासाठी आणि बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. येथील साहसी खेळांचा ही तुम्ही आनंद घेऊ शकता. (Tawang - Arunachal Pradesh)

मनाली (हिमाचल प्रदेश)

हिमाचल प्रदेश हे राज्य पर्यटकांच्या गर्दीने नेहमीच भरलेले असते. वर्षातील १२ ही महिने या राज्यातील विविध स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची येथे नेहमीच रेलचेल असते.

मनाली हे असेच एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे. मनालीमधील बर्फाच्छित प्रदेश, तेथील उंच पर्वत आणि साहसी खेळ, त्यात बर्षवृष्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे नेहमीच गर्दी करतात.

हिवाळ्यात खास करून बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आणि ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यासाठी तुम्ही मनालीचा विचार नक्कीच करू शकता. (Manali - Himachal Pradesh)

Best Hill Stations
Best Hillstaions : बर्फवृष्टीचा आनंद घ्यायचा आहे? मग, उत्तराखंडच्या ‘या’ बेस्ट ठिकाणांची करा निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com