man cuts Amit Shaha kite Video goes Viral 
Trending News

Amit Shah Viral Video : गुजराती पोराने चक्क कापला अमित शाह यांचा पतंग, त्यानंतर काय घडलं? पाहा video

पतंग मोहत्सवादरम्यान एकाने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा पतंग कापल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

रोहित कणसे

देशातील वेगवेगळ्या भागात 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोक हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखतात आणि साजरा करतात. गुजरातमध्ये उत्तरायण म्हणून हा सण ओळखला जातो.

दरम्यान गुजरातमधील उतरायण निमीत्त आयोजित पतंग उत्सवादरम्यानच्या एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या पतंग मोहत्सवादरम्यान एकाने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा पतंग कापल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घराच्या छतावरून पतंग उडवताना दिसत आहे. अचानक दुसऱ्याचा पतंग कापल्यानंतर तो आनंदाने ओरडू लागतो. जेव्हा कॅमेरा दुसऱ्या इमारतीच्या टेरेसकडे वळवला जातो तेव्हा तिथे देशाचे गृहमंत्री अमित शाह दिसतात. यानंतर तो व्यक्ती गुजराती भाषेत सांगतो की, त्याने गृहमंत्री अमित शाह यांचा पतंग कापला. त्या व्यक्तीचा आनंद पाहून अमित शाहाही हसताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर @RVCJ_FB नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक याच्या कमेंटमध्ये व्यक्त होताना दिसत आहे. लोकांनी अनेक मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका यूजरने तुम्ही फक्त मुलांच्या खेळात पराभूत होऊ शकता अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका युजरने काँग्रेसचे लोक या व्यक्तीला निवडणुकीत तिकीट देण्यासाठी शोधत असतील अशी मजेशीर टिप्पणी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT