Video Viral sakal
Trending News

'इथूनच खरी सुरूवात झाली'; अटकेनंतर चंद्राबाबू नायडूंचा मोदींसोबतचा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे सीआयडीच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ३५० कोटींच्या कौशल्य विकास घोटाळ्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अगोदर या प्रकरणी ८ नेत्यांना अटक करण्यात आली आहे.

एन. चंद्राबाबू यांच्या अटकेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलने केले असून त्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर नायडू यांचा जुना एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एन चंद्राबाबू नायडू हे एकाच व्यासपीठावर दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भाजपाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्राबाबू नायडू यांच्या हाताला धरून त्यांना खुर्चीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नायडू हे त्यांना विरोध करताना दिसत आहे. "इथूनच खरी सुरूवात झाली" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

का झाली चंद्राबाबूंना अटक?

चंद्राबाबू नायडूंना कौशल्य विकास घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ईडीच्या तपासात त्यांनी ३५० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर 241 कोटी रुपयांचा निधी त्यांच्याकडून शेल कंपन्यांना पाठवण्यात आला असल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतर आज भल्या पहाटे त्यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT