chandrababu-naidu
chandrababu-naidu

Chandrababu Naidu Arrest : आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना भल्या पहाटे अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Published on

तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. एन. चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी पहाटे अटक करण्यात आली.

चंद्राबाबू नायडू यांना 350 कोटी रुपयांच्या कौशल्य विकास घोटाळ्यात गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. ईडीच्या तपासात हा घोटाळा सिद्ध झाला आहे. 241 कोटी रुपयांचा निधी शेल कंपन्यांना पाठवण्यात आला होता. याप्रकरणी 8 जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

chandrababu-naidu
Maratha Reservation चा तिढा सुटणार? जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत काय घडलं?

शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच एसपीजी दलानेही नायडू यांना नियमानुसार सकाळी 5.30 वाजेपर्यंत अटक केली जाऊ शकत नाही, असे सांगून पोलिसांना परवानगी नाकारली. त्यानंतर अखेर सकाळी 6 वाजता चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या घरातून खाली बोलावून अटक करण्यात आली.

chandrababu-naidu
Maratha Reservation: जरांगेंचं शिष्टमंडळ- CM बैठक संपली; चर्चेनंतर शिंदेंचं सूचक विधान

एपी डीआयजींनी त्यांना कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मंत्री आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (YSRCP) नेत्यांनी दावा केला होता की TDP अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्र्यांना लवकरच अटक केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com