Legendary Boxer Floyd Mayweather Visits Mumbai's Siddhi Vinayak Temple Marathi News 
Trending News

Video : गणपती बाप्पा मोरया...! जग जिंकणार बॉक्सर मुंबईतील सिद्धिविनायक समोर झाला नतमस्तक

Legendary Boxer Floyd Mayweather : जग जिंकणाऱ्या बॉक्सरपैकी एक फ्लॉइड मेवेदर ज्युनियर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे.

Kiran Mahanavar

Legendary Boxer Floyd Mayweather : जग जिंकणाऱ्या बॉक्सरपैकी एक फ्लॉइड मेवेदर ज्युनियर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. यादरम्याने तो मंगळवारी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पासमोर नतमस्तक झाला.

एवढेच नाही तर त्याने तेथे बाप्पाला फळे आणि शालही अर्पण केली. यानंतर पंडितांनी त्याला प्रसादाची टोपली दिली आणि गळ्यात शालही गुंडाळली. मेवेदरने गणपती बाप्पाच्या दरबारात डोके टेकवून दर्शन घेतले.

मेवेदर जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सरपैकी एक आहे. त्याने 15 पेक्षा जास्त मोठ्या जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत. यावेळी सिद्धिविनायक मंदिरातील त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेवेदर भारतात येण्यासाठी खूप उत्साहित आहे आणि त्याने सोमवारी सांगितले होते की, मला यावर्षी भारतात सामने खेळायचे आहे. मेवेदरने बॉक्सिंगमध्ये भारतात आणि परदेशात अनेक विक्रम केले आहेत.

मूळचा अमेरिकेचा असलेल्या मेवेदरकडे 15 वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि लीनल चॅम्पियनशिप विजेतेपद आहेत. तो 2017 मध्ये निवृत्त झाला आणि त्यानंतर त्याने अनेक प्रदर्शनीय सामने खेळले. 1996 च्या ऑलिम्पिकमध्ये त्याने फेदरवेट प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. त्याने तीन वेळा (लाइट फ्लायवेट, फ्लायवेट आणि फेदरवेट) यूएस गोल्डन ग्लोव्हज खिताब जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT