AUS vs IND, Test: टीम इंडिया वर्ष अखेरीस करणार ऑस्ट्रेलिया दौरा! 'या' ठिकाणी होणार कसोटी सामने?

India Tour of Australia: भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
India vs Australia
India vs AustraliaSakal

India Tour of Australia: भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक यावर्षी बरेच व्यस्त आहे. या वर्षाच्या अखेरीस भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही जायचे आहे. या दौऱ्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेचा भाग आहे.

दरम्यान या मालिकेतील पहिला सामना पर्थला होण्याची शक्यता आहे. याबद्दल सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार पर्थव्यतिरिक्त ऍडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी या शहरात देखील या मालिकेतील सामने होणार आहेत.

India vs Australia
Ravindra Jadeja: 'मी घोळक्यात जात होतो अन् थालाने...', जडेजाने सांगितली IPL जिंकल्यानंतरच्या खास क्षणाची आठवण

या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पहिला सामना पर्थला, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे ऍडलेड आणि ब्रिस्बेनला होईल. तसेच चौथा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल, जो मेलबर्नला होईल, तर नवीन वर्षातील सामना अखेरचा असेल, जो सिडनीला होईल.

त्याचबरोबर ऍडलेडला होणारा सामना दिवस-रात्र कसोटी सामनाही असू शकतो. दरम्यान, अद्याप क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वेळापत्रक घोषित केलेले नाही, परंतु या महिन्याच्या अखेरीस या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

तसेच पर्थमध्ये भारतीय संघ 6 वर्षांनी कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी डिसेंबर 2018 मध्ये भारतीय संघाने पर्थमध्ये कसोटी सामना खेळला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळवला होता.

India vs Australia
BAN vs SL: दुश्मनी थांबण्याचं नाव घेईना! बांगलादेशने वनडे मालिका जिंकताच 'तसं' सेलिब्रेशन करत श्रीलंकेला डिवचलं

तसेच लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारतीय संघ जवळपास 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियामध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी 1991-92 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 फरकाने जिंकली होती.

गेल्या दोन दौऱ्यात भारताचे वर्चस्व

दरम्यान, यापूर्वी भारतीय संघाने केलेल्या शेवटच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत वर्चस्व ठेवले होते. भारताने 2018-19 मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती. तसेच 2020-21 मध्ये केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताने कसोटी मालिका 2-1 फरकाने जिंकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com