CCTV Footage Viral Sakal
Trending News

CCTV Footage Viral : भरवस्तीत येत बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार; जुन्नरमधील थरारक घटना

सकाळ डिजिटल टीम

जुन्नर : पुण्यातील जुन्नर येथे एका बिबट्याने पाळीव प्राण्याची शिकार केल्याची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स यांच्या पत्रा शेडमध्ये बिबट्या घुसला.

त्याने पाळीव कुत्र्याची शिकार केली आणि तो त्याला घेऊन पसार झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ पाहून आपलाही थरकाप उडेल.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कुत्रा मालकाच्या उशाला झोपलेला आहे. तर ट्रकच्या पाठीमागून एक बिबट्या दबा धरून बसला आहे. काही वेळाने बिबट्या हळूहळू पुढे येत कुत्रा झोपलेल्या ठिकाणी येतो. क्षणात कुत्र्याला चाहूल लागल्यानंतर तो उठतो पण तेवढ्यात बिबट्या कुत्र्याच्या मानेला पकडून त्याला घेऊन जातो.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून जुन्नर तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तर उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे या परिसरात बिबट्यांचा वावर आढळून येतो. त्यामुळे नागरिकांनी रात्रीच्या वेळी किंवा शेतात जाताना काळजी घेण्याचे अवाहन वन विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT