Viral Video Sakal
Trending News

Viral Video : जैसे ज्याचे कर्म तैसे...! भर रस्त्यात तरूणीची काढली छेड अन् क्षणात मिळाला चोप; घटना CCTV मध्ये कैद

सकाळ डिजिटल टीम

Social Media Viral Video : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर अनेकदा आपण व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधून बोध घेत असतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून आपण एखादे चुकीचे काम केले तर त्याची शिक्षा आपल्याला मिळतेच हा बोध मिळतो. ही घटना एका रस्त्यावर घडली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्याने जात असलेल्या एका तरूणीची छेड काढताना दिसत आहे. तरूणीच्या हाताला धरणे, तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करणे, ढकलणे असे कृत्य करताना तो दिसत आहे. तेवढ्यात तेथे एक मोठी गाडी येते आणि पुढे काही अंतरावर थांबते. या गाडीतून चार जण उतरून पळत येतात आणि या तरूणीला नराधम व्यक्तीच्या तावडीतून सोडवतात.

दरम्यान, गाडीतून आलेले व्यक्ती छेड काढत असलेल्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप देत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून या व्यक्तींनी त्यांला चांगलाच धडा शिकवला आहे.

तर आपल्या वाईट कर्माची शिक्षा आपल्याला नक्की मिळते त्यामुळे कोणतेही वाईट कृत्य करू नये हा बोध या व्हिडिओतून आपल्याला मिळतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT