PM Modi Video Viral Sakal
Trending News

Modi Speech : मोदींचंं भाषण दोन तास लांंबलं; वैतागलेल्या खासदारांनी घेतल्या डुलक्या

काहींंनी जांभई दिली तर काहींनी घेतल्या डुलक्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी सरकारवर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल केला होता. मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी आणि सरकारने बोलण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत जवळपास सव्वादोन तास भाषण केलं.

ज्या मणिपूरच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणला त्या अविश्वासाच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तास १३ मिनीटे ५३ सेकंद भाषण केले. त्यांच्या जवळपास सव्वादोन तासांच्या भाषणामध्ये मणिपूरच्या मुद्द्यावर ते फक्त २० मिनीटे बोलले.

बाकीच्या वेळेत त्यांनी फक्त काँग्रेस आणि विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. त्यांच्या या लांबलेल्या भाषणादरम्यान अनेक खासदार वैतागलेले पाहायला मिळाले. काही खासदारांनी जांभया दिल्या तर काहींनी डुलक्या घेतल्या.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू असताना विरोधकांनी "मणिपूर मणिपूर" अशा घोषणा दिल्या तरीही नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला नाही. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला आणि मोदींनी मणिपूरवर बोलायला सुरूवात केली.

यावेळी सत्तापक्षातील काही खासदारांनी लांबलेल्या भाषणामध्ये डुलक्या घेतल्या. काहीजण जांभई देताना पाहायला मिळाले. सभागृहातील खासदारांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT