Viral Video Sakal
Trending News

Viral Video : हा तर नवा शोध! एकाच बॅटने दोघीजणी खेळतायेत बॅडमिंटन

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या बॅडमिंटन खेळणाऱ्या दोन तरूणींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या एकाच बॅटने बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ पाहून आपणही आश्चर्यचकित व्हाल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन मुली एका बागेत बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. तर एका मुलीच्या हातात बॅट असून ती फुल मारते आणि बॅट दुसऱ्या मुलीकडे फेकते. त्यानंतर दुसरी मुलगी बॅट हातात घेऊन फुल मारते आणि बॅट समोरील तरूणीकडे फेकते. अशा प्रकारे एकाच बॅटने बॅडमिंटन खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर शेअर केलं आहे. तर यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रिया ऐकून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन बनले असून यावर अनेक विनोदी, डान्स, सीसीटीव्ही, लग्न, युवक युवतीचे, जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजन करतात तर काही व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जात असतात. व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून किंवा इंस्टाग्रामवरील रील पाहून अनेकजणांचा दिवस आनंदात जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Atpadi news : शिवसेनेचे तृतीयपंथी पंचायत समिती सदस्याचा हृदयविकाराने मृत्यू, सांगलीच्या आटपाडीमधील घटना

Block Layoffs : AI ने हिरावला तोंडचा घास ! दिग्गज अमेरिकन कंपनीने ४००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Latest Marathi News Live Update : कुसुमाग्रज उद्यानात मनसैनिक करणार आंदोलन

Ruoming Pang: 1800 कोटींचं पॅकेजही ठरलं कमी! कोण आहेत Ruoming Pang? Google, Meta, Apple आणि OpenAI मध्ये रस्सीखेच; शेवटी कोण जिंकलं?

Thane News: ठाण्यातील वनजमिनीवरील पाच दशकांचा शासनाचा दावा फेटाळला, राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका

SCROLL FOR NEXT