Pakistan Beggars 
Trending News

Pakistani Beggars: बापरे! पाकिस्तानातील भिकारी वर्षाला कमावतात 4,200 कोटी रुपये

Pakistani Beggars : पाकिस्तानात भिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून इथले भिकारी जागतीक स्तरावर व्यावसायिकरित्या भीक मागण्यात पटाईत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Pakistani Beggars : पाकिस्तानात भिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून इथले भिकारी जागतीक स्तरावर व्यावसायिकरित्या भीक मागण्यात पटाईत आहेत. जगभरातील या पाकिस्तानी भिकाऱ्यांची कमाई ऐकून तर तुम्ही बेशुद्धच व्हालं. होय! कारण पाकिस्तानचे हे प्रोफेशनल भिकारी मिळून वर्षाला तब्बल ४२०० कोटी रुपयांची कमाई करतात. पण यामुळं पाकिस्तानची प्रतिमा जगभरात मलिन होत आहे.

सौदी अरेबिया, इराक आणि इराणसारख्या देशांमध्ये धार्मिक कार्य आणि तीर्थयात्रेच्या निमित्तानं गेलेल्या २ हजार पाकिस्तानी ‘भिकाऱ्यांचे’ पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. या देशातील सरकारांनी या पाकिस्तानी नागरिक असलेल्या भिकाऱ्यांच्या पासपोर्टवर सात वर्षांची बंदी घातली आहे.

पाकिस्तानी भिकाऱ्यांचा हा त्रास इतका वाढला आहे की, सौदी अरेबिया आणि इराक सारख्या देशांनी पाकिस्तान सरकारला भिकाऱ्यांचा हा लोंढा रोखण्याची विनंती केली आहे. सन 2023 मध्ये मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये पकडण्यात आलेले अनेक पाकिटमारही पाकिस्तानी आहेत.

पाकिस्तानची लोकसंख्या सध्या 230 दशलक्ष आहे, यांपैकी 38 दशलक्ष व्यावसायिक भिकारी आहेत. यांचं दररोजचं सरासरी उत्पन्न 850 पाकिस्तानी रुपये इतकं आहे, पाकिस्तानातील आघाडीचं वृत्तपत्र डॉननं याबबात वृत्त दिलं आहे. या भिकाऱ्यांना भिकेच्या स्वरुपात दररोज एकत्रितरित्या 32 अब्ज रुपये मिळतात. त्यामुळं ही एकूण रक्कम वार्षिक अंदाजे 117 ट्रिलियन रुपये इतकी आहे. डॉलरमध्ये, ही रक्कम 42 अब्ज डॉलर इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर सुप्रीम कोर्टाची नाराजी; सरकारच्या कामकाजावर ठेवणार बारीक नजर

Khadakwasla Dam: खडकवासला धरणातील विसर्ग ४,७०८ क्युसेक; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Maharashtra Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् 48 हजार कोटींची वीज बिले माफ; काय म्हणाले आमदार गाडगीळ, खाडे?

Delhi Police Officer Resignation :'जंतर-मंतरवरील पोरांना मारू शकत नाही'; दिल्लीतील पोलिस अधिकाऱ्याने दिला राजीनामा? व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT