Manoj Jarang: महाविकास आघाडीवाले लपून का बसले? सर्वपक्षीय बैठकीवरील बहिष्कारावरुन जरांगेंचा सवाल

बीड इथं आयोजित शांतता रॅलीमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीवर भाष्य केलं.
if maratha reservation demand not fulfilled will contest assembly election manoj jarange patil
maratha reservation Sakal

मुंबई : काल सरकारनं विरोधीपक्षाला बैठकीला बोलावलं होतं, बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना काय रोग आला होता, त्यांना न जायला काय झालं होतं? ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ही बैठक होती. तर त्या बैठकीत हे विरोधक कोण आहेत ते महाविकास आघाडीवाले, त्यांनी तिथं जाऊन म्हणायचं ना, द्या ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण म्हणून. तुम्ही लपून का बसले? मराठ्यांचं मतदान घ्यायला गोड लागतं का? (Manoj Jarang beed rally targeted MVA who boycott all party meeting regarding Maratha Reservation)

if maratha reservation demand not fulfilled will contest assembly election manoj jarange patil
Pooja Khedkar : पूजा खेडकरला क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळालंच कसं? वडेट्टीवारांचा सवाल, चौकशीची केली मागणी

तिथं बैठकीत जाऊन सांगायचं ते देत नाहीत. पण जरी नाही गेले या महाविकास आघाडीतले पक्ष आले नाही तर नाही कोणी आलं तरी तुम्ही सरकार आहात. तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना? मग तुम्ही देऊन टाकायचं ना? किती दिवस तुम्ही म्हणणार की हा आला नाही तो आला नाही. मग ते आले नाहीत तर आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का?

if maratha reservation demand not fulfilled will contest assembly election manoj jarange patil
Ravi Rana: बडनेरातून रवी राणांना पाठिंबाही नको अन् उमेदवारीही! भाजप नेत्यांचा विरोध

विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारणं सापडली, ते नाही आले त्यांना हिंडू द्या ओढ्याकडून कुठेही. पण तुम्ही द्या ना, पण तुम्हालाही द्यायचं नाही. मला तर डाऊट यायला लागला की दोन्हीही सारखेच आहेत. महाविकास आघाडीवाले आणि महायुतीवाले कारण एक म्हणतं मी मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा.

if maratha reservation demand not fulfilled will contest assembly election manoj jarange patil
Jan Suraksha Bill: शहरी नक्षलवादाला चाप लावण्यासाठी येणार नवा कायदा; विधेयक सभागृहात सादर

तुम्ही यायचं नाही आम्ही म्हणायचं ते आले नाहीत आणि ते आले तर यांनी यायचं नाही. आपल्या नेत्यांना एकदा फोन लावा आणि सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा नाहीतर आमच्या गावात आणि दारातच यायचं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com