Viral Video Sakal
Trending News

Viral Video : परिक्षेला बसलेल्या लेकाला कॉपी द्यायला गेलेल्या बापाला पोलिसांचा काठीने चोप

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव : महाराष्ट्रातील जळगाव येथील एक घटना समोर आली असून आपल्या मुलाला परिक्षेसाठी कॉपी देण्यासाठी गेलेल्या बापाला पोलिसांनी चांगलाच चोप दिल्याची माहिती आहे. जळगाव येथे ही घटना घडली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला दोन पोलीस अधिकारी काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर या मारहाणीमध्ये सदर व्यक्ती जखमी झाला असून तो खाली पडल्यानंतरही त्याला पोलिसांकडून मारहाण केली जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, सध्या १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरू असून राज्यभर या परिक्षेसाठी लगबग सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा येथे बारावीच्या गणिताचा पेपर फुटला होता. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. तर परिक्षार्थींना कॉपी देणाऱ्यांना पोलिसांकडून अशा प्रकारचा चोप दिला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT