Wed, March 22, 2023

Viral Video : 1 कोटींची जॅग्वार कार अडकली स्पीड ब्रेकरवर, लोकांची पळापळ; मुंबईतला प्रकार
Published on : 4 March 2023, 5:42 am
मुंबई : मुंबईतील रस्त्यावरील एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत जॅग्वार सेडान गाडी गर्दीच्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवर अडकली आहे. या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मुंबईतील रस्त्यासंदर्भात संताप व्यक्त करताना दिसत आहे. त्याचबरोबर अडकलेली जॅग्वार गाडी काढण्यासाठी इतर स्थानिक लोकांनी मदत केली आहे.
अक्षरश: गाडी हाताने ढकलून स्पीड ब्रेकरच्या पुढे काढावी लागली असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. "आमच्या मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत योग्य रस्ते का नाहीत?" असा सवाल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरूणाने केला आहे. हा व्हिडिओ @simplysid08 या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.