Pune Crime News Sakal
Trending News

Pune Crime News: महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Latest Marathi News: या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime News : आपला बाकी असलेला तीन महिन्याचा पगार मालकाकडे मागितल्यामुळे सफाई कर्मचारी महिलेला मारहाण केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवड परिसरात घडला होता. ही धक्कादायक घटना पुण्यातील एका ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये घडली होती.

त्यानंतर आता सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती महिलेला बुक्क्यानी मारहाण करताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील निगडीजवळील आकुर्डी येथील सिटी प्राईड कॉम्प्लेक्स मध्ये हा प्रकार घडला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला जबर मारहाण करताना दिसत होता.

दरम्यान, बबिता महेंद्र कल्याणी असं या पीडित महिलेचं नाव असून मागच्या तीन महिन्यापासून तिचा पगार झाला नव्हता. तिने तिच्या कामावर मालक असलेल्या अमजाद खान याचा भाऊ हर्षद खान याच्याकडे पैसे मागितल्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली. (Marathi Tajya Batmya)

हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तक्रार दिली आणि त्यानुसार हर्षद याच्यावर अॅट्रॉसिटी आणि आयपीसी 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT