Pune News: पुणे तिथे काय उणे! वाहतूक पोलिसांनी केली पोलिसांच्याच गाडीवर कारवाई | Pune Traffic Police News | Latest Marathi News | Breaking Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Traffic Police News

Pune News: पुणे तिथे काय उणे! वाहतूक पोलिसांनी केली पोलिसांच्याच गाडीवर कारवाई

Pune News : पुण्यात नियम तोडणाऱ्या पोलीसांच्या वाहनावरच वाहतूक विभागाने कारवाई केली आहे. या वाहनावर चलन फाडून पोलीस अधिकाऱ्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.

या घटनेची अधिकृत माहिती वाहतूक विभागाच्या अधिकृत अकाउंटवरून देण्यात आली असून पुण्यात सध्या या कारवाईची चर्चा रंगली आहे.

अधिक माहितीनुसार, पुणे पोलिस दलातून अधिकारी कर्मचारी यांनी मजूर अड्डा या ठिकाणी फुटपाथवर गाडी उभी केली होती. विचित्र पद्धतीने आणि नियम डावलून गाडी उभी केल्यामुळे नागरिकांना चालताना त्रास सहन करावा लागला होता. (Latest Marathi News)

वाहतूक विभागाला या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या वाहनावर कारवाई करत चलन तयार केले. ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली ही गाडी होती अशा पोलीस अधिकाऱ्याकडून व्यक्तिगत चलन दंड सुद्धा आकारण्यात आला आहे.

Pune Police Action News

Pune Police Action News

या घटनेबाबत वाहतूक पोलिसांनी स्वतः ही बाब ट्विटर वर प्रसारित केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या वाहनावरच कारवाई केल्यामुळे आता समाजात चांगला संदेश पोहचू शकतो.

अनेकदा वाहतूक पोलिसांकडून काही वाहनांवर कारवाई केली जात नाही असे आरोप अनेकदा त्यांच्यावर केले जातात. पण पोलिसांच्या वाहनावरच कारवाई केल्यामुळे आता चांगला संदेश पोहचू शकतो असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.