Rahul Gandhi Marriage Sakal
Trending News

Rahul Gandhi Marriage : 'तुम्ही मुलगी शोधा ना'; राहुल गांधींच्या लग्नावर सोनिया गांधींचे वक्तव्य | Video Viral

दत्ता लवांडे

दिल्ली : राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा केली जाते. त्यावरच आता सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. भेट देण्यासाठी आलेल्या महिलेला राहुल गांधी यांच्या वधू संशोधनाची मोठी जबाबदारी सोनिया गांधी यांनी दिली आहे. राहुल गांधी यांनीच हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी हरियाणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर त्यांच्या समस्या जाणून घेत भात लावणीही केली होती. यावेळी त्यांनी या शेतकरी महिलांना आई सोनिया आणि बहीण प्रियांका यांच्यासोबत आपल्या घरी जेवणाचं आश्वासन दिलं होतं.

त्यानंतर आता दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरी काही महिला शेतकऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी गावरान पद्धतीचे जेवण गांधी परिवासाराठी आणले होते. त्यामध्ये गावरान तूप, गोड लस्सी या पदार्थांचा सामावेश होता. त्यांच्या गप्पागोष्टी आणि डान्सचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.

दरम्यान, यावेळी एका महिलेने सोनिया गांधी यांच्या कानाता प्रश्न विचारला की, "राहुल यांचे लग्न कधी करता?" त्यावर उत्तर देताना सोनिया गांधी म्हणाल्या की, "तुम्ही मुलगी शोधा ना.." या उत्तरावर मोठा हशा पिकला. त्याचबरोबर महागाई, बेरोजगारी याविषयी अनेक गोष्टींवर गप्पा झाल्या. या महिला हरियाणा राज्यातील सोनीपत येथील असून त्यांनी गांधी कुटुंबियांसोबत यावेळी वेळ घालवला.

"तर या खास पाहुण्यांसोबत आज माझी आई, प्रियांका आणि माझा दिवस खास होता" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT