tiger Spotted in village pilibhit UP Video goes viral huge crowd has gathered to see  
Trending News

Video : जंगलच्या राजाचा रुबाब भारी! गावात भिंतीवर 'सनबाथ' घेणाऱ्या वाघाला पाहण्यासाठी तुफान गर्दी

लोकांना याबाबत माहिती मिळताच वाघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं

रोहित कणसे

राज्यासह देशात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान एक वाघ जंगल सोडून गावातील एका घरावर ऊन खात बसल्याचे पाहायला मिळाले. या वाघाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील मानवी निवासी भागात वाघ अनेकदा दिसतात. आता असाच एक प्रकार आटकोना गावातून समोर आला आहे. येथे रात्री वाघ गावात घुसला आणि घराजवळ बांधलेल्या एका भिंतीवर चढून झोपला.

दरम्यान लोकांना याबाबत माहिती मिळताच वाघाला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांच्या गर्दीकडं दुर्लक्ष करत हा वाघोबा भींतीवर बेफिकीर झोपल्याचे गेल्याचे पाहायला मिळले. याबद्दल माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि सापळे लावून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

हे प्रकरण उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील बानंगी काली नगर तहसील भागातील अटकोना गावातील आहे. येथे रात्री उशिरा वाघ गावात आला आणि भिंतीवर येऊन बसला. गावकऱ्यांना माहिती मिळताच शेकडो लोक वाघ पाहण्यासाठी जमले.लोक जमल्यानंतरही वाघ भिंतीवर निवांत झोपल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पीलीभीतमध्ये व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे अनेक वेळा वन्य प्राणी निवासी भागात घुसतात. अनेकवेळा माणसांवर हल्ले झाल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत. ही समस्या वर्षानुवर्षे कायम असून लोकांना यामुळे सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

Miraj Railway: मिरज-कोल्हापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल; पुणे विभागातील मेगा ब्लॉकचा परिणाम; काही गाड्यांचे मार्ग बदलले, काहींचा प्रवास अंशतः कमी

Vastu Tips: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं लावताय? थांबा! वास्तूनुसार ‘या’ ठिकाणी ठेवलेली आर्टिफिशियल झाडं घरासाठी ठरू शकतात अशुभ

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT