Video : 'हिंदू एक धोखा है'; अखिलेश यादवांच्या सूचनेनंतरही सपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; व्हिडीओ आला समोर

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच पक्षातील नेत्यांना वादगृस्त वक्तव्य करणे टाळाण्याचा सल्ला दिला होता.
Samajwadi Party leader Swami Prasad Maurya says Hindu ek dhokha hai after akhilesh yadav warn
Samajwadi Party leader Swami Prasad Maurya says Hindu ek dhokha hai after akhilesh yadav warn

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकतेच पक्षातील नेत्यांना वादगृस्त वक्तव्य करणे टाळाण्याचा सल्ला दिला होता, असे असताना देखील पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुन्हा एक वादगृस्त वक्तव्य केलं आहे. दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदू धर्म एक धोका असल्याचे म्हटले आहे, यानंतर नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असून त्यामध्ये ते हिंदू एक धोका आहे, तसेही सर्वोच्च न्यायालयाने १९९५ मध्ये आपल्या एका आदेशात सांगितलं होतं की हिंदू काही धर्म नाही, ही तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे.

ते पुढं म्हणाले कीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी दोन वेळा सांगितलं की हिंदू काही धर्म नाहीये, हा लोकांची जीवन जगण्याची एक पद्धत आहे, प्रधानमंत्री मोदी यांनी देखील सांगितलं की हिंदू कुठला धर्म नाही, जेव्हा हे लोक वक्तव्य करतात तेव्हा कोणाच्या भावना दुखावल्या जात नाहीत. पण हीच गोष्ट स्वामी प्रसाद मौर्य बोलतात की, हिंदू धर्म, धर्म नही तर एक धोका आहे, ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो काही लोकांसाठी धंदा आहे, तेव्हा लोकांच्या भावना दुखावल्या जातात.

Samajwadi Party leader Swami Prasad Maurya says Hindu ek dhokha hai after akhilesh yadav warn
Viral Video : वाह रे पठ्ठ्या! ट्राफिकमधून वाचण्यासाठी थेट नदीत घुसवली थार; पडलं चांगलचं महागात

नुकतेच लखनऊमध्ये महा ब्राम्हण समाज पंचायतचं सम्मेलन झालं होतं, यामध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासमोर स्वामी प्रसाद मौर्य यांचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला, हिंदू धर्म आणि रामचरितमानस याबद्दल स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्यांबद्दल सपामधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील अशी वक्तव्य थांबवण्याची मागणी केली होती.

Samajwadi Party leader Swami Prasad Maurya says Hindu ek dhokha hai after akhilesh yadav warn
Kerala Bridge Collapse: केरळमध्ये ख्रिसमसच्या उत्सवाला गालबोट! पूल कोसळल्याने अनेक जण जखमी

जेव्हा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला तेव्हा अखिलेश यादव यांनी सर्व नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना अश्वासन दिलं होतं की, अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाईल. तसेच त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना धर्म आणि जातींबद्दल वक्तव्य करू नका. अखिलेश यादव यांनी यापूर्वी देखील याबद्दलचे आवाहन केले होते, मात्र त्याचा फारसा काही फरक पडल्याचे दिसून येत नाहीये. त्यामुळे अखिलेश यादव आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com