Divyanka Viral Video  esakal
Trending News

Divyanka's Viral Video : टीव्हीवरील संस्कारी सूनेचा दबंग अंदाज भन्नाट व्हायरल! बघा व्हिडीओ

दिव्यांकाचा बाईक रायडींगचा दबंग अंदाज सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय

सकाळ ऑनलाईन टीम

Divyanka Tripathi Viral Video : टेलिव्हीजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही सगळ्यांच्याच चर्चेतील एक नाव आहे. तिच्या सूनेच्या भूमिकेतील अभिनयानं तिला वेगळी ओळख मिळवून दिलीय. दिव्यांकाची फॅन फॉलोवींगही मोठी आहे. टीव्ही क्षेत्रातील सून म्हणून तिची जास्त ओळख असली तरी पर्सनल आयुष्यात ही अभिनेत्री 'फूल टू एन्जॉय' मूडमध्ये दिसून येते. तिच्या बाईक रायडींगचा दबंग अंदाज सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

स्टार प्लसच्या प्रसिद्ध शो 'ये है मोहब्बतें' फेम दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अशाच एका पोस्टमुळे दिव्यांका पुन्हा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीसोबतचे काही फोटो तिच्या सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसत आहे.

तिने (Divyanka Tripathi)शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती काळ्या रंगाचे जॅकेट, काळी जीन्स आणि बाइकर बूट घालून एका लक्झरी क्रूझर बाइकवर बसलेली दिसत आहे. तिने काळ्या रंगाचे हेल्मेटही घातले आहे. त्याचवेळी दिव्यांकासोबत तिचा पती विवेक दहियाही दिसत आहे. विवेकने ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिम जीन्ससह बाइकर लूक दिला आहे.

ही पोस्ट शेअर करताना दिव्यांकाने तिच्या पोस्टला #RiderCouple असे कॅप्शन दिले आहे. दिव्यांकाची ही स्टाईल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीव्हीवरील सुसंस्कृत सुनेचा दबंग बाईक रायडर लूक सर्वांनाच आवडला आहे. (viral video)

दिव्यांका त्रिपाठी शेवटची रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसली होती. या शोमध्ये दिव्यांकाने धोकादायक स्टंट करून सर्वांना चकित केले. अभिनेत्री या शोची रनर अप होती. दिव्यांका त्रिपाठी 'बनू में तेरी दुल्हन' आणि 'ये है मोहब्बतें' या मालिकेनंतर प्रसिद्ध झाली. सध्या तिचे सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रिटीएवढे फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT