Video Viral  Sakal
Trending News

Zomato बॉयने पार्सल देण्यासाठी स्वत:च बनवलं ड्रोन; छतावर दिली पहिली डिलीव्हरी | Video Viral

देशी जुगाडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात जुगाडुंची कमी नाही. आपल्या येथील तरूणांकडे टॅलेंट खूप आहे फक्त त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही असं अनेकदा बोललं जातं. कमी खर्चाची आणि चार्जिंगवर चालणारी गाडी, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गाड्या तयार करणे किंवा नवनव्या जुगाडू वस्तू बनवणे असे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले असतील पण सध्या एका डिलीव्हरी बॉयने चक्क ड्रोन बनवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

सदर व्यक्ती हा झोमॅटो या कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. वाहतूक कोंडी, पाऊस आणि रस्ते या सगळ्या समस्यांना वैतागून या तरूणाने ग्राहकांचे पार्सल वेळेत पोहचवण्यासाठी काहीतरी जुगाड करण्याचे ठरवले.

त्यानंतर त्याने स्वत: एक ड्रोन तयार करायचे ठरवले, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून या तरूणाने ड्रोन बनवलं आणि यशस्वीरित्या पार्सल पाठवलं. पहिलं पार्सल त्याने ग्राहकाच्या घराच्या टेरेसवर दिले. ड्रोनच्या माध्यमातून या तरूणाने पिझ्झा घरपोच पाठवला आहे.

दरम्यान, या ड्रोनची चाचणी करत असताना त्याला अनेकदा अपयश आले पण शेवटी या तरूणाने ड्रोन बनवले आणि पार्सल देण्याचे आपले काम सोपे केले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून आता ड्रोनद्वारे पार्सल देण्याचे तंत्रज्ञान विकसित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT