न्यूयॉर्कच्या टाईम्स चौकात झळकला मराठी दाम्पत्याचा व्हिडिओ; स्वत:ला पडद्यावर पाहून भारावले | Video Viral

त्यांनी न्यूयॉर्कमध्ये आपल्या आईवडिलांचं स्वागत मराठी संस्कृतीप्रमाणे केलं.
Viral Video
Viral VideoSakal

प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना त्यांना हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचे स्वप्न असते किंवा त्यांना परदेशातील महत्त्वाचे ठिकाणे फिरवून आणण्याचे ध्येय असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका मराठी मुलाने आपल्या आईवडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची सफर घडवली आहे.

राम बोडके या मराठी व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपल्या आईवडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये बोलावून घेतलं होतं. ते तिथे वास्तव्यास असल्यामुळे त्यांनी आपल्या आईवडिलांचं स्वागत ओवाळणी करत मराठी संस्कृतीप्रमाणे केलं, या आईवडिलांच्या स्वागताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा तो दाखवण्यात आला.

विशेष म्हणजे त्या आईवडिलांचा व्हिडिओ ज्या चौकातील पडद्यावर झळकला ते पाहण्यासाठी हे दाम्पत्य हजर होते. मोठ्या पडद्यावर स्वत:ला पाहून तेही भारावून गेल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Viral Video
"एक आडवा नि तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं... मेला कंत्राटदार हसतो..."; Mumbai-Goa Highway वरून मनसेचं खोचक ट्वीट

हा व्हिडिओ पाहून तुमचं मन भारावून गेलं नाही तर नवल. परदेशी गेलेली मुलं परत मायदेशी फिरकत नाहीत, अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. मात्र राम बोडके या सगळ्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत. आपल्या आईवडिलांचे अनेक व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यांचे हे व्हिडिओ पाहून भारतातूनच नाही तर जगभरातून कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com