Union Budget 2023
Union Budget 2023 Sakal
Union Budget Updates

Union Budget 2023 : बळीराजासाठी स्टार्टअप ते 'ग्रीन ग्रोथ'; अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून बाहेर आले खास गिफ्ट

दत्ता लवांडे

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थसंकल्प सादर केला. भारताच्या अर्थव्यस्थेला चांगली गती मिळून अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल अशी आशा यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शेती क्षेत्रासाठी त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. कृषीपूरक व्यवसाय, नवीन स्टार्टअप, कृषीकर्ज, मत्स्य व्यवसाय, कापूस, डाळी यासंदर्भात शेतकऱ्यांना प्रोत्साहन केले जाणार असल्याच्या घोषणा यावेळी कृषीमंत्र्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांने मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये भरड धान्य, हॉर्टिकल्चर, सेंद्रीय शेती, मत्स्य विकास, कापूस, डाळी, हरित क्रांती, ग्रीन ग्रोथ, हरित उर्जा, कृषीपूरक स्टार्टअप यावर भर देण्यात आला आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा आणि मांडलेले मुद्दे

  • 'ग्रीन ग्रोथ' च्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार

  • पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचलणार

  • शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवणार, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार

  • कापसापासून सर्वांत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

  • डाळींसाठी विशेष हब तयार केलं जाणार

  • कृषीसंदर्भातील स्टार्टअपना चालना देणार

  • पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष दिलं जाणार

  • पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा

  • सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य

  • मत्स व्यवसाय विकासासाठी ६ हजार कोटींची तरतूद

  • हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरसाठी विशेष अनुदान जाहीर

  • अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार

  • कृषीपुरक स्टार्टअपना पाठबळ

  • छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्राधान्य

  • कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक ताकद देणार

  • हरित क्रांतीसाठी विशेष योजना

अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

  • भरड धान्यांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार

  • हॉर्टिकल्चर साठी २ हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • कृषी कर्जाचे लक्ष ३० लाख कोटींपर्यंत वाढवणार

  • कृषी क्रेडिट कार्डची मर्यादा २० लाख कोटींवर नेणार

  • देशात २०० बायोगॅस प्लँट उभारणार

  • फलोत्पादनासाठी २२०० कोटींची तरतूद

  • कृषि क्षेत्रासाठी कोल्ड स्टोरेज वाढवणार

  • पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केला जाईल

  • नैसर्गिक शेती करण्यासाठी १ कोटी शेतकऱ्यांनी मदत केली जाणार

  • मच्छिमारांसाठी विशेष पॅकेजची घोषणा, ६ हजार कोटींचा फंड

  • सहकारातून शेतील बळ देणार

  • केमीकलचा वापर कमी करून पर्यावरण पूरक खतांना प्रोत्साहन दिलं जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

  • रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल.

  • बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्त्रियांचा विकास

  • कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक ताकद देणार

  • हरित क्रांतीसाठी विशेष योजना

  • सेंद्रीय शेतीसाठी पीएम प्रणाम योजना

भारत ही जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून देशाने ८० कोटी जनतेला वर्षभर मोफत अन्नधान्य आणि १०२ कोटी जनतेचे मोफत लसीकरण केले आहे. तसेच भारत हा उज्वल भविष्याच्या मार्गावर असून अनेक देशांनी भारताचे कौतुक केले असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. सर्वांगीण विकासाचं स्वप्न पूर्ण होताना दिसत असून भारताने मोठ्या मंदीतही यशस्वी वाटचाल केली. जी २० चं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे असंही मत अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT