Union Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा, वाचा सविस्तर

Union Budget 2023
Union Budget 2023Sakal

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थसंकल्प सादर केला. भारताच्या अर्थव्यस्थेला चांगली गती मिळून अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल अशी आशा यावेळी अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

अर्थमंत्र्यांनी मांडलेले मुद्दे आणि घोषणा

  • भारत ही जगातील पाचवी मोठी आर्थव्यवस्था

  • गरिबांना २०२४ पर्यंत मोफत धान्य मिळणार त्यासाठी २ लाख कोटींची तरतूद

  • भारताने १०२ कोटी जनतेचं मोफत लसीकरण केलं

  • लडाख, ईशान्य भारतावर विशेष लक्ष

  • भारत हा उज्ज्वल भविष्याच्या मार्गावर

  • जी २० चं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

  • यूपीआय आणि कोविन अॅपमुळे जगाने भारताचं महत्त्व मान्य केलं.

  • सर्वांगीण विकासाचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे.

  • मोठ्या मंदीतही भारताची यशस्वी वाटचाल, मोठ्या देशांनी भारताचं कौतुक केलं, भारताचं कर्तृत्व उजळून निघालं.

  • शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये रक्कम देण्याची योजना यशस्वी झाली

  • नव्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. सर्वांगीण विकासाचं स्वप्न पूर्ण केलं

शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणा

  • ग्रीन ग्रोथ च्या माध्यमातून रोजगार निर्मीती करणार

  • पर्यटनाला चालना देण्यासाठी पावलं उचलणार

  • शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म बनवणार, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाणार

  • कापसापासून सर्वांत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

  • डाळींसाठी विशेष हब तयार केलं जाणार

  • कृषीसंदर्भातील स्टार्टअपना चालना देणार

  • पर्यावरण संवर्धनाकडे विशेष लक्ष दिलं जाणार

  • पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा

  • सहकार मॉडेलला येत्या काळात प्राधान्य

  • मत्स विकासासाठी ६ हजार कोटींची तरतूद

  • हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरसाठी विशेष अनुदान जाहीर

  • अन्न साठवण विकेंद्रीकरण योजना राबवणार

  • कृषीपुरक स्टार्टअपना पाठबळ

  • छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्राधान्य

  • कृषी क्रेडिटसाठी मोठी आर्थिक ताकद देणार

  • हरित क्रांतीसाठी विशेष योजना

अर्थमंत्र्यांच्या मोठ्या घोषणा

  • भरड धान्यांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जाणार

  • हॉर्टिकल्चर साठी दोन हजार २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • कृषी कर्जाचे लक्ष ३० लाख कोटींपर्यंत वाढवणार

  • कृषी क्रेडिट कार्डची मर्यादा २० लाख कोटींवर नेणार

  • देशात २०० बायोगॅस प्लँट उभारणार

  • सहकारातून शेतील बळ देणार

  • केमीकलचा वापर कमी करून पर्यावरण पूरक खतांना प्रोत्साहन दिलं जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे.

  • रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com