Burned Sugarcane Field esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 4 एकरचा ऊस जळून खाक

जितेंद्र मेखे

शिंदखेडा (जि. धुळे) : तालुक्याचे माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या नेवाडे शिवारात असलेल्या चार एकरातील उसाला (Sugarcane field) शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याने त्या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. सुमारे चार लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग विझविण्यासाठी शिंदखेडा, दोंडाईचा येथून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. (4 acres of sugarcane burned in fire caused by short circuit Dhule News)

शिंदखेडा शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेवाडे गावाच्या शिवारात माजी आमदार रामकृष्ण पाटील यांचे शेत आहे. यातील चार एकरात उसाची लागवड करण्यात आली होती. मंगळवारी (ता.१७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे शेतातील उसाला आग लागली. हवा असल्यामुळे आगीने काही वेळेतच उग्र रूप धारण केले. आग लागल्याचे सालदाराच्या लक्षात आल्यावर त्याने तत्काळ ही माहिती श्री. पाटील यांना दिली. पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ऊस जळून खाक झालेला होता. आगीवर नियंत्रण करण्यासाठी शिंदखेडा व दोंडाईचा येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग विझविण्यात आली.

या आगीत चार एकर ऊस जळून खाक झाल्याने सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर देखील कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली नव्हती. शिंदखेडा तालुक्यात काही प्रमाणात बागायती शेती करण्याचे धाडस शेतकरी करतात. परंतु अशा कारणांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. पर्यायाने शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडतो. त्यामुळे अशा कारणांमुळे शेतीचे नुकसान झाल्यास तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT