400 employees present at ST Depot Nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar | ST आगारात 400 कर्मचारी हजर

धनराज माळी

नंदुरबार : एसटी (MSRTC) विलीनीकरण आंदोलनातील कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने अखेर नंदुरबार आगारातील संपात सक्रिय सहभागी असलेले चारशेवर कर्मचारींनी बैठक घेत एकाचवेळेस कामावर हजर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बडतर्फ केलल्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त चारशे कर्मचारी सोमवारी (ता.१८) एकाच दिवशी सेवेत पुर्ववत हजर झाले. आगारप्रमुख मनोज पवार यांनी त्यांची प्रशासकीय प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पूर्ण करून घेतली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) कार्यक्रमाचे निमित्त साधून घेतलेल्या बैठकीत १८ एप्रिलला सर्वांनी एकाच वेळेस कामावर हजर राहण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार सोमवार सकाळपासूनच सर्व कर्मचारी आगारात जमले होते. त्यापूर्वी संघटनेची बसस्थानक परिसरात बैठक झाली. त्यात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

हजर केल्याची पोच नाही

दरम्यान, बैठकित कर्मचाऱ्यांना कामावर हजर केले जात आहे. मात्र तशी लेखी पोच आगारप्रमुख देत नसल्याचा मुद्दा कर्मचाऱ्यांचा बैठकित लावून धरण्यात आला. मात्र याबाबत आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले की, एकाच वेळेस एकत्रित येऊन सर्वच कर्मचारी हजर होत आहेत. त्यांची प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी व वेळ लागतो. न्यायालयाच्या निकालानंतर टप्या टप्याने हजर झाले असते तर प्रशासकीय पुर्तता करताना तारांबळ उडाली नसती. त्यामुळे आता हजर करून घेणे महत्त्वाचे आहे. पोच नंतर दिली जाईल. असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत सर्वांना हजर करून घेण्यात आले.

प्रशिक्षणानंतर आज सेवा सुरू

महामंडळाच्या निर्णयानुसार गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचारी संपात होते. ते कामावर नसल्याने त्यांना कामावर घेण्यापूर्वी प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. त्यामुळे उद्या (ता.१९) दुपारपर्यंत सर्वांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर दुपारून सर्वच बससेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे आगारप्रमुख श्री. पवार यांनी सांगितले.

बस आगाराला दीडशे नाम फलक भेट

गेल्या सहा महिन्यापासून संपामुळे सारेच विस्कळित झाले होते. आता बसेसला नाम फलक (nameplate) मिळणेही मुश्कील होते. त्यामुळे बसेसच्या काचेवर खडू ने कुठून कुठे बस जात आहे. ते लिहिले जात होते. त्यामुळे प्रवाशांना ते लक्षात येत नव्हते, ही गरज लक्षात घेता येथील प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांच्या पुढाकाराने हॉटेल राजस्थानचे संचालक पप्पूभय्या अग्रवाल यांच्या देणगीने नंदुरबार बस आगाराला दिडशे नाम फलके भेट देण्यात आले. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या उपस्थितीत आगारप्रमुख मनोज पवार यांच्याकडे दीडशे नामफलक सुपूर्द करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT