ST ची चाके रूळावर; जळगाव विभागातून दिवसभरात 4 हजार फेऱ्या!

MSRTC is back 4000 rounds a day from Jalgaon division Jalgaon News
MSRTC is back 4000 rounds a day from Jalgaon division Jalgaon News esakal

जळगाव : लालपरी आता हळूहळू रूळावर येत आहे. जळगाव जिल्‍ह्यातील सर्वच आगारातून (Depot) कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. जिल्‍ह्यात आतापर्यंत ३ हजार ५१४ कर्मचारी रुजू झाल्‍याने जवळपास सर्वच बसफेऱ्या सुरू झाल्‍या आहेत.

राज्‍य परिवहन महामंडळाचे (State Transport Corporation) राज्‍य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी जवळपास साडेपाच महिने एसटी कर्मचारी संपावर होते. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याची अंतिम तारीख दिली आहे. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू होत असून, जळगाव जिल्ह्यातील आगारात मिळून तब्बल ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

MSRTC is back 4000 rounds a day from Jalgaon division Jalgaon News
मालेगाव महानगरपालिकेला लाभले दोन उपायुक्त; सहाय्यक आयुक्त पद रिक्तच

तरीही ६७९ कर्मचारी अद्याप संपात

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलनाला सुरवात केली होती. तेव्‍हापासून सुरू असलेला संप आता हळूहळू मिटू लागला आहे. कामावर रुजू होण्याबाबत वेळोवेळी महामंडळाकडून आवाहन केले. यानंतर जळगाव विभागातील ३ हजार ५१४ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तरीदेखील अद्याप ६७९ कर्मचारी हे संपात सहभागी आहेत.

MSRTC is back 4000 rounds a day from Jalgaon division Jalgaon News
नाशिक : सोमानी उद्यान अतिक्रमणमुक्त

४ हजाराच्‍या जवळपास फेऱ्या

जळगाव विभागातील जवळपास ८० टक्‍के कर्मचारी हे कामावर रुजू झाले आहेत. यामुळे लांबपल्‍ल्‍यासह स्‍थानिक फेऱ्या देखील वाढल्‍या आहेत. शिवाय अमळनेर व जामनेर आगारातून ग्रामीणच्‍या फेऱ्या देखील सुरू केल्‍या आहेत. यामुळे जळगाव विभागातून दिवसभरात ४ हजाराच्‍यावर फेऱ्या होत आहेत. फेऱ्या वाढल्‍याने विभागाला सोमवारी दिवसभरात ५९ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मिळाले.

"संपात सहभागी असलेल्‍यांपैकी जवळपास ८० टक्‍के कर्मचारी आता कामावर हजर झाले आहे. उर्वरित कर्मचारी देखील रुजू होती. सर्व कर्मचारी हजर झाल्‍यानंतर विभागाचे उत्‍पन्‍न वाढीसाठी विशेष मोहीम राबवू."

- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com