cobra found in cattle shed latest marathi news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : गुरांच्या गोठ्यात आढळला 5 फुटी कोब्रा

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील शेतकरी छगन मराठे यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्यात पाच फुटी कोब्रा (Cobra) नाग आढळून आल्याने एकच धावपळ उडाली. (5 foot cobra found in cattle shed nandurbar latest Marathi News)

शेतकरी शरद छगन मराठे हे नेहमीप्रमाणे शेतात काम करीत असताना गुरांना चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांच्या गुरांच्या गोठ्यात साठवून ठेवलेल्या चाऱ्‍यात लपून बसलेल्या सापाचा अचानक पुस्कारा आल्याने त्यांनी हातात घेतलेला चारा खाली फेकत जीव वाचवून बाजूला झाले.

यावेळी त्यांनी मित्रांच्या मदतीने सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून सापाविषयी माहिती दिली. दरम्यान, नंदुरबार येथील सर्पमित्र प्रतीक कदम, तेजस मालचे, कुणाल भावसार, सागर साठे यांनी सापाचा शोध घेतला असता तो कोब्रा जातीचा नाग असल्याचे सांगितले.

हा इंडियन कोब्रा जातीचा नाग पाहिल्यावर भल्या-भल्यांची थरथराट होते. त्याला सर्प मित्रांनी व्यवस्थित पकडून निसर्गाच्या अधिवासात सोडले. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून गावासह शिवारात अनेक मोठमोठे विषारी, बिनविषारी सर्प निघत आहेत. त्यांना पकडून हे सर्पमित्र जंगलामध्ये सोडून देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT