
Jalgaon : अपघातातील जखमी वयोवृद्धेचा मृत्यू
बातमीदार : जीवन चव्हाण
चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील भडगाव रस्ता ओलांडतांना एका वयोवृद्धेला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या वयोवृद्धा महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Elderly woman dies in accident jalgaon latest Accident News)
हेही वाचा: भऊर घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल; दीड कोटीची फसवणूक
याबाबत सविस्तर वृत्त, शहरातील शिवशक्तीनगर येथील बसवंताबाई सुखदेव वेळीस (वय-७२) ह्या एका खासगी दवाखान्यात नर्स म्हणून कामाला आहे. दरम्यान १ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शहरातील भडगाव रस्ता ओलांडत होत्या.
तेव्हा चाळीसगावकडून भडगावकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसवंताबाई वेळीस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला. परंतु प्रकृतीत सुंधारणा न झाल्यामुळे त्यांना धुळे येथील दवाखान्यात हलविण्यात आला.
त्याठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होता. मात्र अचानक प्रकृतीत बिघाड होऊन ८ जुन रोजी सकाळी ९:३० वाजता प्राणज्योत मावळली. तत्पूर्वी अपघात घडताच अज्ञात दुचाकीस्वार पसार झाला. याप्रकरणी मुलगा सुनील सुखदेव वेळीस यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चालकाविरुद्ध १४ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा: Nashik : पाझर तलाव फुटल्याने रस्त्याला भगदाड; निकृष्ट कामाचे पितळ उघड
Web Title: Elderly Woman Dies In Accident Jalgaon Latest Accident News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..