Fraud Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Fraud Crime : डिसान अ‍ॅग्रो टेकची 60 लाखांत फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील एमआयडीसीतील नामांकित डिसान अ‍ॅग्रो टेक कंपनीची तब्बल ५५ ते ६० लाखांत फसवणूक झाली आहे.

या प्रकरणी कंपनीतील तीन संशयितांवर मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (60 lakh fraud of Deesan Agro Tech dhule crime news)

कंपनीचे कर्मचारी अशोक मुकुंदा सोनार (वय ५२, रा. शिरपूर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अवधान येथील डिसान अ‍ॅग्रो टेक प्रा. लि कंपनीतील इलेक्ट्रिक वजनकाट्यावरील ऑपरेटर अमित संजय कासार (रा. वाखारकरनगर, धुळे), विकास भटू पानगे (रा. मोहाडी) व प्रमोद दिलीप सोनवणे (रा. सौंदाणे, ता. धुळे) यांनी संगनमत केले.

त्यातून १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कंपनीत डीओसी पेंड माल खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये तो ऑर्डरप्रमाणे भरून दिल्यानंतर वाहनाचा वजनकाटा कंपनीच्या बाहेर सोडून कंपनीच्या गेटवरील सिक्युरिटी गार्डमार्फत वाहन पुन्हा कंपनीत आणले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामध्ये वेळोवेळी एक ते दोन टन वजनाचा डीओसी पेंड माल प्रतिटन ५० हजार रुपयांप्रमाणे अधिक भरून त्या मोबदल्यात संबंधितांकडून मिळणारी रक्कम आपापसात वाटून घेतली.

स्वतःच्या फायद्यासाठी मालाची चोरी करीत विश्वासघात केला. कंपनीच्या परवानगीशिवाय सरासरी ५५ ते ६० लाख किमतीचा डीओसी पेंड माल वाहनांमध्ये अधिक भरून कंपनीची फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी संशयित अमित कासार व विकास पानगे याला अटक केली आहे. मोहाडीचे सहाय्यक पोलिस अधिकारी भूषण कोते तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT