MLA Kunal Patil and other dignitaries, villagers present at the Bhoomipuja of Chinchwar-Saitale road work. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : चिंचवार-सैताळे रस्त्याचे भूमिपूजन

तालुक्यातील चिंचवार ते सैताळे रस्ताकामाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील चिंचवार ते सैताळे रस्ताकामाचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने या रस्ताकामासाठी एक कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर झाला. (Bhoomipujan of Chinchwar Saitale road dhule news)

चिंचवार ते सैताळे रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार या रस्त्याच्या कामासाठी आमदार पाटील यांनी शासनाकडून एक कोटी ९१ लाख रुपये निधी मंजूर करून आणला.

त्यासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत या रस्त्याचे काम होत आहे.

या निधीतून सैताळे-चिंचवार रस्त्याचे डांबरीकरण होणार असून, आवश्यक ठिकाणी पाइप मोऱ्यांचे बांधकाम केले जाणार आहे.

रस्त्याच्या कामामुळे सैताळे, चिंचवारसह परिसरातील रहिवासी, शेतकरी, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. १५ जानेवारीला आमदार पाटील यांच्या हस्ते रस्ताकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी बाजार समितीचे संचालक एन. डी. पाटील, कृषिभूषण भिका पाटील, सैताळेचे सरपंच गिरधर मोरे, माजी सरपंच सुनील पाटील, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, रवी मराठे, लाकमानीचे उपसरपंच बाजीराव महाले.

सैताळेचे पोलिसपाटील त्र्यंबक पाटील, जिभाऊ सखाराम पाटील, दिलीपसिंग गिरासे, माजी सरपंच भटू पाटील, भटू गिरासे, उपअभियंता व्ही. एम. पाटील, सहाय्यक अभियंता सूर्यवंशी, प्रदीप पाटील, पंडित पाटील.

प्रशांत पाकळे यांच्यासह सैताळे, चिंचवार, लामकानी, वडणे, निकुंभे, शिरधाणे प्र. नेर येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

SCROLL FOR NEXT