
Dhule News : वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेसोबत नागरिकांचाही सहभाग अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचा आहे.
असे प्रतिपादन जिल्हा रस्तासुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. (MP Dr. Subhash Bhamre statement Participation of citizens is important to prevent accidents dhule news)
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात सोमवारी (ता. १५) ३४ व्या राष्ट्रीय रस्तासुरक्षा अभियानाचे उद्घाटन झाले.
खासदार डॉ. भामरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश संदीप स्वामी, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक ए. आर. यादव, प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक (वाहतूक) भूषण कोते आदी उपस्थित होते. खासदार डॉ. भामरे म्हणाले, की देशात दर वर्षी एक ते दीड लाख नागरिक रस्ते अपघात मृत्युमुखी पडतात. त्याच्यापेक्षाही दुप्पट नागरिक अपंग होतात.
यात तरुणांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. हे चित्र चिंताजनक आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी मोटार कंपन्या निर्माते, रस्ते निर्माण करणारे अभियंते, वाहतूक खाते, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, सरकारी यंत्रणा, बिगरसरकारी संस्था, प्रवासी, नागरिक या सर्वांनी रस्ता अपघातातील मृत्यू रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे.
अपघातानंतर पहिल्या तासाच्या आत अपघातग्रस्तांना मदत मिळाल्यास त्यांचा जीव आपण वाचवू शकतो. वाहन चालविताना हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नियम पाळणे गरजेचे
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने रस्तासुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या वर्षी १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान रस्तासुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. स्वामी म्हणाले, की २०२३ मध्ये देशात एक लाख ६८ हजार नागरिकांचा अपघाताने मृत्यू झाला. बहुतांश अपघात हे दुसऱ्यांच्या चुकीमुळे होतात. त्यामुळे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.
अपघात रोखण्याचे प्रयत्न
पोलिस अधीक्षक धिवरे यांनी २०२३ मध्ये धुळे जिल्ह्यात साडेतीनशेपेक्षा अधिक रस्ते अपघात झाल्याचे सांगितले.
अपघातांच्या मूळ कारणांचा शोध घेऊन पोलिस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच सर्वसामान्य जनता या सर्वांनी मिळून जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कसे रोखता येईल यादृष्टीने काम करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
श्री. नवले, यादव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रस्तासुरक्षा अभियानाच्या माहिती पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
महिलांना हेल्मेटवाटप करण्यात आले. श्री. कदम यांनी प्रास्ताविक केले. श्री. कोते यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.