MLA Farooq Shah during the Bhoomi Puja of Abhyasika in Kabirganj area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कबीरगंजमध्ये 25 लाखांतून अभ्यासिका; आमदार फारूक शाह यांच्या हस्ते भूमिपूजन

कबीरगंज भागातील अभ्यासिकेचे आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरवासीयांच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी सोय व्हावी या अनुषंगाने धुळ्यात चार ठिकाणी अभ्यासिका बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी दिली.

यातील कबीरगंज भागातील अभ्यासिकेचे आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. २५ लाख रुपये खर्चातून हे काम होणार आहे. (Bhoomipujan performed by MLA Shah of 25 lakh Abhyasika of Kabirganj area dhule news)

महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांचा विकास योजनेंतर्गत या अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत. शहरातील वीटभट्टी देवपूर, साक्री रोड, कबीरगंज व जिरेकरनगर येथे या अभ्यासिका उभारण्यात येणार आहेत.

मुस्लिमबहुल वसाहतींमध्ये लहान घरे, गरिबी परिस्थिती यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती खुंटते. ही बाब लक्षात घेऊन प्रभाग-३ मधील वीटभट्टी, प्रभाग-१२ मधील कबीरगंज येथे अभ्यासिका प्रस्तावित केली.

त्यातील कबीरगंज सर्व्हे नंबर-४०३ (जुन्या हबिबी शाळेजवळ) २५ लाख रुपये खर्चातून अभ्यासिका बांधण्यात येणार आहे. या कामाचे आमदार श्री. शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. याप्रसंगी नासिर पठाण, आमिर पठाण, डॉ. सरफराज अन्सारी, साजिद साई, डॉ. दीपश्री नाईक, इक्बाल शाह.

निजाम सय्यद, हारून खाटीक, आसिफ शाह, शोएब मुल्ला, शाहिद शाह, सुलेमान मलिक, हालिम शमसुद्दीन, नाजीम शेख, ॲड. जुबेर अन्सारी, बबलू अन्सारी, लल्या अन्सारी, युनूस शेख, जावेद खाटीक, मुस्ताक शेख, रियाज शाह यांच्यासह परिसरातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्रव्यवहार करूनही सुरक्षा व्यवस्था नव्हती!नागपूरमधील स्फोटानंतर बारूद कामगार संघटना आक्रमक, कंपनीवर गंभीर आरोप

Tejas Express Delay: ऐन होळीच्या सणात रेल्वेचा 'शिमगा'! तेजस एक्सप्रेस ७ तास उशिरा सुटणार, प्रवाशांचे प्रचंड हाल

इस्रायल-इराण युद्धामुळे दुबईत अडकले भारतीय, मदतीसाठी टोल फ्री नंबर जारी; नाव नोंदणी करण्याचं आवाहन

Video : ईश्वरीचा जीव धोक्यात पाहून अखेर अर्णवने दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

UP Holi Tradition: या गावात होळीला का खेळला जात नाही रंग? भगवान श्रीकृष्ण आणि भक्त प्रल्हादाशी आहे थेट संबंध, हे आहे भावुक कारण

SCROLL FOR NEXT