Dhule Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळ्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. २) धुळ्यात येत आहेत.
NCP's Dhule City-District President Kailas Chaudhary while giving information about Deputy Chief Minister Ajit Pawar's programs in Dhule.
NCP's Dhule City-District President Kailas Chaudhary while giving information about Deputy Chief Minister Ajit Pawar's programs in Dhule.esakal

Dhule Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. २) धुळ्यात येत आहेत. श्री. पवार यांच्या हस्ते शहराच्या विविध भागातील ५० बोअरवेलचे डिजिटली उद्‍घाटन होईल. पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या कार्यालयाला भेटही देतील.

दरम्यान, श्री. पवार यांचे पक्षातर्फे शहरात जोरदार स्वागत केले जाईल, अशी माहिती शहराध्यक्ष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Deputy Chief Minister Ajit Pawar in Dhula today news)

उपमुख्यमंत्री पवार जळगाव, नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या आग्रहावरून ते धुळ्यात येत आहेत.

२ फेब्रुवारीला सकाळी सातला त्यांचे गोंदूर विमानतळावर आगमन होईल. दरम्यान, त्यांच्या हस्ते शहरातील विविध ५० बोअरवेलचे डिजिटली उद्‍घाटन होईल.

पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष चौधरी यांच्या झाशी राणी चौकातील कार्यालयालाही ते सदिच्छा भेट देतील. गोंदूर विमानतळ मार्ग-दत्त मंदिर-नेहरू चौक-पंचवटी-पांझरेवरील छोटा पूल-महाराणा प्रताप चौक-झाशी राणी पुतळ्यामार्गे राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात त्यांचे आगमन होईल.

NCP's Dhule City-District President Kailas Chaudhary while giving information about Deputy Chief Minister Ajit Pawar's programs in Dhule.
Dhule Municipality News : स्मारके, धार्मिक स्थळांजवळ आता ‘नो चमकोगिरी’; महापालिका महासभेत निर्णय

विमानतळापासून कार्यालयापर्यंत श्री. पवार यांचे वाजतगाजत स्वागत केले जाईल. सहा जेसीबींद्वारे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जाईल.

तसेच क्रेनद्वारे मोठा फुलहार देऊन फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत केले जाईल. पक्षाचे सरचिटणीस जहागीरदार यांनी धुळे शहरात स्वखर्चाने २५० बोअरवेल करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यांपैकी १७२ बोअरवेल करण्यात आले आहेत.

५० बोअरवेलचे श्री. पवार यांच्या हस्ते उद्‍घाटन होईल. आठवडाभरात या बोअरवेल पूर्ण करण्यात येतील. उर्वरित बोअरवेल लोकसभा निवडणुकीनंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. चौधरी यांनी दिली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रवींद्र आघाव, युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सारांश भावसार, शहर युवाध्यक्ष कुणाल पवार, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, कार्याध्यक्ष शशी खैरनार, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

NCP's Dhule City-District President Kailas Chaudhary while giving information about Deputy Chief Minister Ajit Pawar's programs in Dhule.
Dhule Marathon 2024 : धुळे शहरात शुक्रवारपासून टी-शर्ट, बीबचे होणार वाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com