crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : लाखाची रोकड, दागिने घेऊन वधू गायब; तरुणाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : खमपाडा (ता. साक्री) येथील तरुणाशी लग्न केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांतच वधू एक लाखाची रोकड व दागिने घेऊन पळून गेली. पहिले झालेले लग्न लपवून ७० हजारांचे दागिने घेऊन फसवणूक केली.

या प्रकरणी संशयित चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.(bride ran away with 1 lakh cash and jewellery dhule crime news)

याबाबत सुनील जगन ठाकरे (वय २९, रा. खामपाडा) याच्या फिर्यादीनुसार ललिता धवळ्या बहिरम, धवळू मंगळू बहिरम, मनोहर धवळू बहिरम (तिघे रा. बंधारपाडा, नागझिरी, ता. साक्री) व मुन्ना रवींद्र गांगुर्डे (रा. मचमाळ, ता. साक्री) या चौघांनी ललिता हिचा मुन्ना गांगुर्डे याच्याशी विवाह झालेला असताना ही बाब लपवून ठेवून तिचा सुनील ठाकरे याच्याशी विवाह लावला.

तसेच त्याच्याकडील ७० हजारांचे सोन्याचे दागिने करून घेतले. लग्नानंतर ललिता संसार न करता व काही न सांगता मुन्ना गांगुर्डे याच्यासोबत निघून गेली.

जाताना घरातून सोन्याचे दागिने व एक लाखाची रोकड घेऊन गेली. यासंबंधी सुनील हा धवळू अहिरम व मनोहर महिरम यांना विचारण्यास गेला असता दोघांनी सुनीलसह त्याचे काका व भावाला धक्काबुक्की केली.

शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. हा प्रकार ११ ते १६ मेदरम्यान घडला. या प्रकरणी शुक्रवारी (ता. २७) पिंपळनेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT