Bribe taker forester Sunil Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : लाचखोर वनपाल अटकेत

निखिल सूर्यवंशी, धुळे

धुळे : लाकडासह जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी पंधरा हजारांच्या लाचेची (Bribe) मागणी केल्याप्रकरणी वनपालाविरूद्ध गुन्हा दाखल झाला. नंतर त्यास अटक झाली. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Bribery Prevention Department) ही कारवाई केली. सुनील आधार पाटील (वय ५७) असे अटकेतील वनपालाचे नाव आहे. (Corrupt forester arrested for taking bribe Dhule Crime News )

शहरातील देवपूरमधील दत्तमंदिर कॉलनीत रस्ता रुंदीकरणाकामी अडथळा ठरणारी झाडे महापालिकेने तोडली. तोडलेल्या झाडांची लाकडे पीक-अप वाहनात भरून तक्रारदाराचा मुलगा पारोळा चौफुलीमार्गे शहरात येत होता. त्याला कॉटन मार्केटजवळ धुळे वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वाहनासह अडविले आणि वाहन कार्यालयात जमा केले. त्यानंतर तक्रारदाराने वनपरिक्षेत्र कार्यालयात जप्त वाहन सोडविण्यासाठी वनपाल सुनील पाटील यांची भेट घेतली. त्यांनी वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंदर्भात तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी केली असता वनपाल पाटील याने तक्रारदाराकडे साक्षीदारांसमक्ष पंधरा हजारांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदारासंबंधी वनपाल पाटील याला शंका आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ केली. नंतर पडताळणीवरून वनपाल पाटील याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाल्यावर अटक केली. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: राज्यात पावसाची उघडीप; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज जारी

Friendship Story: रक्ताच्या नात्यांपेक्षाही मैत्री श्रेष्ठ! देश-विदेशातून 54 डॉक्टर मित्र एकवटले; दिवंगत मित्राच्या कुटुंबासाठी 18 लाख जमवले

ENG vs PAK: इंग्लंडसमोर पाकिस्तानचे लोटांगण! जो रुटच्या संघाचा लॉर्ड्सवर दणदणीत विजय, WTC Points Table मध्येही फायदा

EL NINO IMPACT : 'सुपर एल निनो'चा भारतावर काय होणार परिणाम? गेल्या 7 दशकांतील सर्वात तीव्र हवामान बदलाचा इशारा; देशात माॅन्सूनचा पाऊस 14 टक्के कमी!

Marathi News Live Updates : 'वसुधैव कुटुंबकम्'चा विचार स्वीकारा; इतरांची सेवा करणे हे आपले कर्तव्य - मोहन भागवत

SCROLL FOR NEXT