Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police destroys distilleries

Jalgaon : पाटणा परिसरातील गावठी दारूच्या हातभट्टी नष्ट

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील पाटणा- ओढरे रस्त्यावरील डोंगराळ परिसरात गावठी दारुच्या भट्टीवर (Distilleries) ग्रामीण पोलिसांनी आज अचानक छापा टाकून हातभट्टीवरील गावठी दारु (Liquor) तयार करण्याचे सुमारे ४२ हजारांचे साहित्य नष्ट केले. या कारवाईचे विशेषतः महिलांमधून स्वागत होत आहे. दरम्यान, या भागातील इतरत्र असलेल्या गावठी दारुच्या हातभट्ट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Village distilleries destroyed in Patna area Jalgaon Crime News)

पाटणा- ओढरे रस्त्यावरील डोंगराळ भागात गेल्य अनेक दिवसांपासून गावठी दारूची हातभट्टी तयार करुन तिची सर्रास विक्री केली जात होती. डोंगराळ भागातील नदीमुळे पाण्याची उपलब्धता असल्याने व पोलिसांना या ठिकाणी येणे सहज शक्य नसल्याने दारुच्या अनधिकृत हातभट्ट्या अनेक दिवसांपासून आहेत. ही माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी साडेआठच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, गावठी दारुच्या हातभट्टीवर एक हजार चारशे लिटर कच्चे रसायन, सात निळ्या रंगाच्या टाक्यांमध्ये गुळ, नवसागर, एरंडी मिश्रीत गावठी रसायना पोलिसांना मिळून आले. हा सर्व सुमारे ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच नष्ट केला.

हेही वाचा: Jalgaon : बॅंक लुटण्याच्या प्रयत्नातील संशयित ताब्यात

तालुक्यातील लोणजे, बोढरे, शिवापूरसह पाटणादेवच्या जंगल भागातही दारुच्या हातभट्ट्या असल्याचे या भागातील महिलांनी सांगितले. त्यामुळे त्यांचाही शोध घेऊन त्या देखील नष्ट कराव्यात, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी देविदास दामू पवार (रा. पाटणा, ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, युवराज नाईक, भूपेश वंजारी व श्री. सुतार यांनी केली.

हेही वाचा: पारोळा शाळेत वही पेन देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

Web Title: Village Distilleries Destroyed In Patna Area Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrimeliquor
go to top